हैदराबादेत मद्यधुंद तरुणीची कार थेट रेल्वे ट्रकवर

हैदराबादेत मद्यधुंद तरुणीची कार थेट रेल्वे ट्रकवर

हैदराबादमध्ये एका महिलने प्रताप केला. तिने चक्क रेल्वे ट्रकवरच कार दामटवली. यामुळे एकच खळबळ उडाली. परिणामी बंगळुरू-हैदराबाद रेल्वे मध्येच थांबवावी लागली. तसेच अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवेवर परिणाम झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तेलंगणामधील शंकरपल्ली येथे लिंगमपल्ली ते विकाराबाद जंक्शनदरम्यान ही घटना घडली. व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला तिची कार रेल्वे ट्रकवर पळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

महिलेच्या कृतीने आजूबाजूचे लोक ओरडताना दिसत आहेत. काही जण तत्काळ रेल्वे विभागाला माहिती देण्याची विनंती करत आहेत. पुढील अनर्थ टाळता यावा यासाठी लोकांनी तिची कार थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ही महिला कुणाचेच काही ऐकण्याच्या मनःस्थिती नसल्याचे दिसते. ही महिला कोण आहे, तिने ही कृती मुद्दामहून केली की तिची मानसिक स्थिती चांगली नाही का, हे शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

रेल्वे सेवेला फटका

महिलेची मानसिक अवस्था ठीक नव्हती. महिलेला आटोक्यात आणणाऱ्या उपस्थितांना नाकीनऊ आले. प्राथमिक चौकशीत असं दिसून आलंय की, ती एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करत होती, ती उत्तर प्रदेशातील आहे. महिलेच्या वेडेपणाचा फटका रेल्वे सेवेला बसला. 10 ते 15 ट्रेनचे मार्ग बदलण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;