प्रियंकाला सुवर्णपदक

प्रियंकाला सुवर्णपदक

हिंदुस्थानची चालण्याच्या शर्यतीतील अॅथलिट प्रियंका गोस्वामी हिने इन्सब्रुकमधील ‘ऑस्ट्रियन रेस वॉकिंग चॅम्पियनशिप’मध्ये महिलांच्या 10 किलोमीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. प्रियंकाने 47 मिनिटे 54 सेपंद वेळेसह या शर्यतीत बाजी मारली. तिने 20 किलोमीटर शर्यतीत एक तास 28.45 सेपंद वेळेसह राष्ट्रीय विक्रम केलेला आहे.

प्रियंका गोस्वामीची 10 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीतील वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी 45 मिनिटे 47 सेकंद इतकी आहे. 2022मध्ये तिने ही सर्वोच्च वेळ नोंदविली होती. ‘मी एक मिनिटाच्या पेनल्टीनंतरही सुवर्णपदक जिंकण्याची किमया केली,’ असे प्रियंकाने शर्यतीनंतर सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मे महिन्यात मेलबर्नमध्ये झालेल्या ‘अॅथलेटिक्स व्हिक्टोरिया वॉकिंग चॅम्पियनशिप’मध्ये दुसरे स्थान मिळविले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;