शिव विधी व न्याय सेनेचे उद्या शिवसेना भवन येथे शिबीर

शिव विधी व न्याय सेनेचे उद्या शिवसेना भवन येथे शिबीर

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिव विधी व न्याय सेनेच्या वतीने शुक्रवार, 13 जूनला संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत शिवसेना भवन येथे कायदेशीर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

शिबिरात मुख्य वक्ता म्हणून बार काैन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष विठ्ठल काेंडे देशमुख हे ‘वकिली व्यवसायातील नैतिकता आणि मूल्ये’ यावर उपस्थित वकिलांना मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 250 हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना वर्षभराचे शालेय साहित्य देण्यात येणार आहे. यावेळी विविध जिल्हे आणि तालुक्यांमधून मोठय़ा संख्येने वकील उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना युवासेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, साईनाथ दुर्गे, पराग डाके, उपनेत्या विशाखा राऊत, सुषमा अंधारे, उपनेते नितीन नांदगावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिव विधी व न्याय सेनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष अॅड. नितीश सोनवणे, उपाध्यक्ष (प्रभारी) अॅड. स्वप्ना कोदे, सरचिटणीस अॅड. मनोज कोंडेकर, चिटणीस अॅड. सुमित घाग, चिटणीस अॅड. दर्शना जोगदणकर, समन्वयक अॅड. भूषण मेंगडे आणि संपूर्ण कार्यकारिणी व सदस्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शिव विधी व न्याय सेना ही शिवसेना पक्षाची अंगीकृत संघटना आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;