झेडपी अधिकाऱ्यांच्या दलालीत अडकली दुर्वेस आरोग्य केंद्राची इमारत, जिल्हा परिषदेतील बाबू बनले खाबू; सलग दुसऱ्यांदा निविदा प्रक्रिया रद्द

झेडपी अधिकाऱ्यांच्या दलालीत अडकली दुर्वेस आरोग्य केंद्राची इमारत, जिल्हा परिषदेतील बाबू बनले खाबू; सलग दुसऱ्यांदा निविदा प्रक्रिया रद्द

पालघर जिल्हा परिषदेतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या दलाली प्रकरणामुळे तालुक्यातील दुर्वेस प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम रखडले आहे. आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी पहिली निविदा प्रक्रिया जिओ टाकी तर दुसरी प्रक्रिया मुख्यमंत्र्यांनी काम थांबवले असे सांगून रद्द करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कमकुवत असताना झेडपीतील भ्रष्ट बाबूंच्या खाबुगिरीने मंजूर झालेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम लटकल्याने संताप व्यक्त होत आहे.

दुर्वेस प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत नसल्याने गेल्या आठ ते दहा वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार दुर्वेस ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या जागेतून सुरू आहे. पाच वर्षांपूर्वी जिल्हा परिषद व पंचायतीकडून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी वनविभागाकडे सामूहिक वनहक्क दावा सादर केला होता. दोन वर्षे पाठपुरावा आणि आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर हेरिटेज मिल्क प्रॉडक्ट कंपनीलगतची 45 गुंठे जमीन उपलब्ध झाली होती. दरम्यानच्या काळात बांधकामासाठी 7 कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध झाला. मात्र पुन्हा या कामाची निविदा रद्द झाली आहे

कमिशन देण्यास नकार दिल्याने वचपा काढला
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाचे कार्यादेश देण्याच्या वेळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्याने ठेकेदारकडे कमिशन मागितले. ठेकेदाराने या मागणीला नकार दिला. याचा राग आल्याने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील एकाने तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांना जिओ टॅगिंगसंदर्भात विधानसभा अधिवेशनात झालेल्या मुद्द्यांबाबत दिशाभूल करणारी माहिती देत दुर्वेस प्राथमिक आरोग्य केंद्राची निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा शेरा मिळवला व आरोग्य केंद्राच्या कामात खो घातला होता. त्यात आता दुसऱ्यांदा मंजूर झालेली कामे व सुरू न झालेली कामे यांना विलंब होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी दिलेला स्थगिती आदेश पुढे करून या कामात पुन्हा खोडा घातला गेला आहे. त्यामुळे या आरोग्य केंद्राची दुसरी निविदा रद्द झाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;