कारचालकाच्या धमकीमुळे वृद्ध रिक्षाचालकाची आत्महत्या

कारचालकाच्या धमकीमुळे वृद्ध रिक्षाचालकाची आत्महत्या

कार-रिक्षाचा अपघात झाल्यानंतर कारचालकाने आर्थिक नुकसानभरपाईसाठी धमकी देऊन तगादा लावल्याने डोंबिवलीत एका वृद्ध रिक्षाचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुंजाजी शेळके (68) असे मृत रिक्षाचाल काचे नाव आहे.

मोठागाव रोड येथे मुंजाजी शेळके यांच्या रिक्षाचा एका चारचाकीला धक्का लागला. यानंतर कारचालक आकाश म्हात्रे यांनी दमदाटी करत मुंजाजी शेळके यांना स्वतःच्या घरी नेऊन डांबून ठेवले होते. पैसे घेऊन ये आणि रिक्षा घेऊन जा असा दम देत मध्यरात्री शेळके यांना सोडून दिले. शेळके यांनी घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. आर्थिक नुकसान, रिक्षा जप्त केल्याची स्थितीचा त्यांच्या मनावर मोठा परिणाम झाला. सकाळी घरातील मंडळी बाहेर गेल्यावर शेळके यांनी किचनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलीस ठाण्यात ठिया
मुंजाजी शेळके यांच्या आत्महत्येनंतर कुटुंबीय, नागरिक आणि रिक्षाचालकांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यावर धडक दिली. आकाश म्हात्रेविरुद्ध कारवाईची मागणी करत ठिय्या दिला. यानंतर पोलिसांनी आकाश म्हात्रे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;