6500 रहिवाशांना न्याय न मिळाल्यास मंत्रालयावर मोर्चा, डोंबिवलीतील 65 इमारतींचे बनावट रेरा प्रकरण

6500 रहिवाशांना न्याय न मिळाल्यास मंत्रालयावर मोर्चा, डोंबिवलीतील 65 इमारतींचे बनावट रेरा प्रकरण

डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या 65 बेकायदेशीर इमारती प्रकरणात खऱ्या दोषींवर कारवाई न करता किरकोळ कामगारांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने भूमाफिया, बिल्डर आणि बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या दलालांच्या मुसक्या आवळा अशी मागणी केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेघर होणाऱ्या नागरिकांच्या प्रश्नांसाठी वेळ न दिल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही शिवसेनेने दिला आहे.

भूमाफिया आणि काही बिल्डरांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे रेरा नोंदणी करून कल्याण, डोंबिवलीत शेकडो बेकायदा इमारती उभ्या केल्या आहेत. यातील 65 इमारतींवर तोडक कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायाल याने दिले आहेत. यामुळे साडेसहा हजार कुटुंबीय रस्त्यावर येण्याचा धोका आहे. आयुष्याची पुंजी खर्चुनही डोक्यावरचे छप्पर जाणार असल्याने 65 इमारतींमधील रहिवाशांनी शासनाकडे दाद मागितली होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी इमारती पाडल्या जाणार नाहीत असे आश्वासन देऊन मते मिळवली होती. मात्र सत्तेवर येताच महायुती सरकारने या रहिवाशांना वाऱ्यावर सोडले आहे. पालिकेने रहिवाशांना तातडीने घरे रिकामी करण्याच्या नोटिसा धाडल्या आहेत.

न्यायाची खात्री
धास्तावलेल्या फ्लॅटधारकांनी शिवसेनाच आपल्याला न्याय देईल या खात्रीने कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांची भेट घेतली. यावेळी बोलताना दीपेश म्हात्रे यांनी ऐन पावसाळ्यात नागरिकांना बेघर करणे चुकीचे असल्याचे सांगितले. 65 इमारतींमधील रहिवाशांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे आहोत आणि मुख्यमंत्र्यांनी वेळ न दिल्यास जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही दिला

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;