नववीतील विद्यार्थ्याच्या खुनाने अहिल्यानगर हादरले! सीताराम सारडा शाळेतील घटना;हल्लेखोर आठवीतील मुलगा ताब्यात

नववीतील विद्यार्थ्याच्या खुनाने अहिल्यानगर हादरले! सीताराम सारडा शाळेतील घटना;हल्लेखोर आठवीतील मुलगा ताब्यात

अहिल्यानगर शहरातील सीताराम सारडा या शाळेत नववीमध्ये शिकत असलेल्या मुलाचा खून करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. रात्री उशिराने यासंदर्भातला गुन्हा दाखल होणार आहे. दरम्यान, पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. अफान तन्वीर शेख असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

या शाळेत आठवीमध्ये शिकणाऱ्या मुलाने नववीतील अफानसोबत मागील कारणावरून हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. आठवीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाने त्याच्याकडे असलेल्या चाकूने नववीतील अफानवर वार केले. यात गंभीर जखमी अफानला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बागडपट्टी येथील सीताराम सारडा महाविद्यालय हे हिंदसेवा मंडळाचे आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये या शाळेत प्राध्यापक हेरंब कुलकर्णी हे प्राचार्य म्हणून कार्यरत होते. त्यांनी जेव्हा पदभार घेतला तेव्हा त्यांनी आजूबाजूच्या अवैध धंद्यांना आळा घालण्याची मागणी केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;