‘तारीख पे तारीख’… ऑक्सिओम-4 मोहीम पुन्हा लांबणीवर

‘तारीख पे तारीख’… ऑक्सिओम-4 मोहीम पुन्हा लांबणीवर

ऑक्सिओम-4 मिशन चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी प्रक्षेपित होणारे ऑक्सिओम-4 मिशन बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटचे प्रक्षेपण होणार होते. परंतु ते द्रव ऑक्सिजन गळतीमुळे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने दिली आहे. आज सकाळी प्रक्षेपण वाहनाच्या बूस्टर स्टेजची कामगिरी तपासण्यात आली. प्रोपल्शन बेमध्ये एलओएक्समध्ये ऑक्सिजन गळती आढळून आल्याने मोहीम पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. या मोहिमेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे सांगण्यात आले. या मिशनमध्ये चार देशांचे चार अंतराळवीर 14 दिवसांसाठी अंतराळ स्थानकात जाणार आहेत. या मोहिमेचे आज उड्डाण झाले असते तर हिंदुस्थानचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीर 12 जून रोजी रात्री 10 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळावर पोहोचले असते. या ठिकाणी अभ्यास करून ते 25 ते 26 जून रोजी पुन्हा पृथ्वीवर परतले असते. ऑक्सिओम-4 मिशनचे पायलट असलेले शुभांशु शुक्ला हे एक अनुभवी लढाऊ आणि चाचणी वैमानिक आहेत. त्यांना 2000 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे.

उड्डाण चौथ्यांदा टळले

ऑक्सिओम-4 मिशनचे प्रक्षेपण पुढे ढकलण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी ही मोहीम 29 मे रोजी प्रक्षेपित होणार होती, परंतु काही तांत्रिक कारणामुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर ते 8 जून, 10 जून आणि 11 जून अशी सलग तिसऱयांदा पुढे ढकलण्यात आली आहे. आता हे प्रक्षेपण कधी होणार यासंबंधीची नवी तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;