अमरनाथ यात्रेसाठी लष्कराचे सर्च ऑपरेशन
3 जुलैपासून सुरू होणाऱया अमरनाथ यात्रेआधी लष्कराने हीरानगरच्या सीमावर्ती भागात शोध मोहीम सुरू केली. अमरनाथ यात्रा 3 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. जम्मू-कश्मीरमध्ये लष्कर अलर्ट मोडवर असून ठिकठिकाणी जवान तैनात करण्यात आले आहेत. पोलीस आणि सुरक्षा एजन्सीच्या संयुक्त टीमने अतिसंवेदनशील भागासह ठिकठिकाणी शोध मोहीम राबविण्यात आली. सुरक्षा दलांनी स्थानिक लोकांनी अलर्ट राहण्यास सांगितले आहे. अमरनाथ धामला पोहोचण्यासाठी पहलगाम आणि बालटाल असे दोन मार्ग सुरू करण्यात आले आहेत. अमरनाथ यात्रेआधी पोलीस, सीएपीएफ, एसडीआरएफ यांच्याकडून संयुक्तपणे मॉकड्रिल करण्यात आले. यावेळी स्फोट, चेंगराचेंगरी, आगीची घटना, दहशतवादी हल्ला आणि रस्ते अपघातांसंबंधी मॉक ड्रिल करण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List