मोदींनी 11 वर्षांत केल्या 33 चुका! काँग्रेसचा जबरदस्त प्रहार

मोदींनी 11 वर्षांत केल्या 33 चुका! काँग्रेसचा जबरदस्त प्रहार

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जबरदस्त प्रहार करीत मोदींनी 11 वर्षांच्या कार्यकाळात तब्बल 33 मोठय़ा चुका केल्याचे म्हटले आहे. भाजप सरकारने ‘ईडी’सारख्या केंद्रीय एजन्सीची भीती घालून काँग्रेस पक्ष फोडण्याचाही प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. मी गेल्या 65 वर्षांपासून राजकारणात आहे. मात्र मोदी यांच्यासारखा खोटे बोलणारा पंतप्रधान आजपर्यंत कधीही पाहिला नाही, असा सणसणीत टोलाही खरगे यांनी लगावला आहे.

‘आपण खोटे बोलतो, चुका करतो, मते मिळवण्यासाठी तरुणांना आणि गरीबांना मूर्ख बनवतो. हे मोदी मान्य करीत नाहीत,’ असे खरगे म्हणाले.

2047ची स्वप्ने, आजच्या समस्यांचे काय – राहुल गांधी

मोदी सरकारच्या अपयशी कारभारावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही जोरदार टीका केली. मोदी सरकारने आता 2025 वर बोलणे बंद केले आहे. ते थेट 2047 ची स्वप्ने विकत आहेत. आज देश कोणत्या गोष्टींना तोंड देत आहे, हे कोण पाहणार, असा सवालही त्यांनी केला.

मोदी सरकारने गेल्या 11 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात हिंदुस्थानची लोकशाही, अर्थव्यवस्था आणि सामाजिक रचनेला मोठा धक्का दिला आहे. हुकूमशाहीची शाई घासण्यात मोदी सरकारने संविधानाचे प्रत्येक पान वाया घालवले आहे!- मल्लिकार्जुन खरगे,काँग्रेस अध्यक्ष

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;