‘या’ एका अटीवर नवज्योतसिंग सिद्धू कपिल शर्माच्या शोमध्ये परतले आहेत, वाचा सविस्तर

‘या’ एका अटीवर नवज्योतसिंग सिद्धू कपिल शर्माच्या शोमध्ये परतले आहेत, वाचा सविस्तर

कपिल शर्माचा कॉमेडी शो आता लवकरच पुन्हा सुरु होणार आहे. मुख्य म्हणजे हा शो अनेक दिवसांपासून येणार अशा बातम्या येत होत्या. नेटफ्लिक्सवर येणारा हा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ पाहण्यासाठी आता सर्वचजण उत्सुक आहेत. द ग्रेट इंडियन कपिल शोचे याआधी दोन सीझन प्रसारित झाले आहेत. आता येणारा हा तिसरा सीझन, पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या सीझनचा प्रोमो सध्या चांगलाच चर्चेत आहे. परंतु याबरोबरीने सर्वात महत्त्वाची चर्चा आहे ती म्हणजे ठोको ताली बोलणाऱ्या नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा शोमध्ये दिसणार आहेत.

नवज्योतसिंग सिद्धू या शो मध्ये आपल्याला दिसणार आहेत. परंतु याकरता त्यांनी एक महत्त्वाची अट ठेवली आहे. सिद्धू यांनी स्वतः याबद्दल एका व्लॉगच्या माध्यमातून याबद्दल खुलासा केला आहे. सिद्धू म्हणाले की, मी निर्मात्यांना सांगितले होते की जर अर्चना पूरण सिंग देखील शोमध्ये असतील तरच मी शो करेन. मी दुर्गा मातेचा भक्त आहे आणि एखाद्या महिलेच्या हातून तिचे काम काढण्याचे कारण मला व्हायचं नाही. म्हणूनच मी निर्मात्यांना अर्चना पुरणसिंग यांना शोमध्ये ठेवण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आता आम्ही दोघेही या शोमध्ये एकत्र दिसणार आहोत.

सिद्धू पुढे म्हणाले, ‘मी माझ्या पत्नीसोबत प्रेक्षकांच्या मागणीवरून शोमध्ये आलो होतो, मला मिळालेले प्रेम अफाट होते. ते म्हणतात की मी पुन्हा एकदा शोमध्ये परतत आहे, शोचा भाग झाल्यानंतर असे वाटते की, मी घरी परतलो आहे.

काही वर्षांपूर्वी, सिद्धू यांनी राजकीय कारणांमुळे कपिलच्या शोला अलविदा म्हटले होते. तेव्हापासून अर्चना पूरण सिंग त्यांच्या शोमध्ये दिसू लागली. आता दोघांना एकत्र पाहणे प्रेक्षकांसाठी अनोखी पर्वणी असणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;