बंगळुरू शहर प्रदूषणाने मारतंय… व्यावसायिक दांपत्याचा शहर सोडण्याचा निर्णय

बंगळुरू शहर प्रदूषणाने मारतंय… व्यावसायिक दांपत्याचा शहर सोडण्याचा निर्णय

छोटा व्यवसाय करणाऱ्या एका दाम्पत्याने बंगळुरुमध्ये दोन वर्षे घालवली. आता मात्र त्यांनी बंगळुरू शहर सोडायचे ठरवले आहे. आम्हाला वाटतंय की बंगळुरू हळूहळू आम्हाला मारत आहे असे म्हणत या दोघांनीही शहर सोडण्याचा निर्णय घेतला. या दोघांची पोस्ट व्हायरल होतेय. अश्विन आणि अपर्णा दोघेही कॉर्पोरेट कल्चरमध्ये काम करतात. त्यांनी स्वतःचा व्यवसायही सुरू केला आहे. या जोडप्याने पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या.

बंगळुरू आम्हाला हळूहळू मारतंय असे आम्हाला वाटत आहे. त्यामुळे आता आम्ही हिंदुस्थानची सिलिकॉन व्हॅली समजले जाणारे शहर सोडतो आहोत. आम्ही राहायला सुरुवात केली तेव्हा इथले लोक खूप चांगले आहेत, वातावरणही खूप चांगले आहे हे आम्हाला लक्षात आले. पण एक काळ लोटल्यानंतर वातावरणात बदल होऊ लागले. आम्ही इथे सारखे आजारी पडू लागलो. इथे राहू लागल्यानंतर मला आता श्वास घेण्यासंबंधीचा त्रास उद्भवला आहे. अश्विन याने तर मला सर्दी आणि खोकला होणं हा त्रास सारखा होऊ लागला आहे, असे सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;