Iran Israel War – ट्रम्पला इराणचा फक्त ‘फोर्डो’ नष्ट करायचा होता! नेत्यानाहू FINISH THE JOB म्हणत काय म्हणाले

Iran Israel War – ट्रम्पला इराणचा फक्त ‘फोर्डो’ नष्ट करायचा होता! नेत्यानाहू FINISH THE JOB म्हणत काय म्हणाले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना फक्त इराणच्या फोर्डो अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला करायचा होता. पण इस्रायल मात्र इराणच्या अणुप्रकल्पाचा सर्वनाश करण्यावर ठाम होते. याकरता नेत्यानाहू यांनी जवळपास आठवडाभर ट्रम्पसह अमेरिकन प्रशासनाला पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. हाच काळ होता जेव्हा ट्रम्प मीडियाला सांगत होते की, त्यांना निर्णय घेण्यासाठी 2 आठवड्यांचा कालावधी लागणार आहे.

इराणचे सर्वात महत्त्वाचे अणुऊर्जा केंद्र फोर्डो अमेरिकन बी-2 बॉम्बर बॉम्बने नष्ट केले. परंतु इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू आणि इस्रायलचे धोरणात्मक व्यवहार मंत्री रॉन डर्मर यांनी अमेरिकेने केवळ फोर्डोच नव्हे तर, नतान्झ आणि इस्फहान अणुऊर्जा केंद्रे देखील पूर्णपणे उद्धवस्त करावीत, असे ट्रम्प यांना सांगितले होते. इस्त्रायलने आधीच इराणचे अणुऊर्जा केंद्रे नष्ट केली होती. परंतु बंकर ब्लास्टर तंत्रज्ञान इस्त्रायलकडे नसल्याने, अमेरिकेला गळ घातली. त्यानंतर अमेरिका हल्ल्यासाठी तयार झाली.

जिंकू किंवा मरू….मात्र आता ध्येयपूर्ती झाल्याशिवाय थांबणार नाही; नेत्यानाहू यांची घोषणा

13 जूनपासून सुरू झालेल्या या इस्रायली हल्ल्यात दोन्ही बाजूंनी मृतांची संख्या 1000 च्या आसपास पोहोचली आहे. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात आतापर्यंत 950 इराणी नागरिकांचा मृत्यू झाला असून, 3450 जखमी झाले आहेत.

एका इस्रायली अधिकाऱ्याने जेरुसलेम पोस्टला सांगितले की, “चार दिवसांपूर्वी नेतन्याहू आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांमध्ये फोनवर चर्चा झाली होती, त्यादरम्यान ट्रम्प म्हणाले, ‘मी हल्ला करण्याचा निर्णय घेतला आहे.’ या अहवालानुसार, इस्रायलने इराणवर हल्ला केल्यापासून ट्रम्प आणि नेतान्याहू जवळजवळ दररोज एकमेकांसोबत संवाद साधत होते.

इस्रायलने पहिल्याच दिवशी इराणच्या नतान्झ आणि इस्फाहान अणुऊर्जा केंद्रांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन्ही केंद्रांचे मोठे नुकसानही करण्यात आले होते. त्यानंतर फक्त इराणचा फोर्डो अणुऊर्जा प्रकल्प उरला होता. परंतु एका इस्रायली अधिकाऱ्याने जेरुसलेम पोस्टला सांगितल्याप्रमाणे, नेतान्याहू आणि डर्मर यांनी ट्रम्पला इस्फाहान अणुऊर्जा केंद्राला लक्ष्य करण्यास पटवून देण्यात यशस्वी झाले जेणेकरून काम पूर्णत्वास नेता येईल.

नेतन्याहू यांनी याकरता FINISH THE JOB हे वाक्य वापरले होते. म्हणजेच इस्रायल अमेरिकेला हे पटवून देण्यात यशस्वी झाला की, इराणला नमवण्यासाठी त्यांच्या तीन प्रमुख अणुऊर्जा केंद्रांचा सर्वनाश करणे आवश्यक आहे. ही केंद्रे होती – नातानझ, इस्फहान आणि फोर्डो. यापैकी, इस्रायलने आधीच स्वतःहून नातानझ आणि इस्फहानवर हल्ला केला होता. परंतु बंकर ब्लास्टर तंत्रज्ञानाच्या अभावामुळेच नेत्यानाहू यांनी अमेरिकेस काम पूर्ण करण्यास मनवले.

एका इस्रायली सूत्राने सांगितले की, “अमेरिकेने या ठिकाणांमधील अशा ठिकाणी हल्ला केला जिथे इस्रायलला पोहोचण्यास अडचण येत होती.” “अमेरिकेने इस्फहानमधील डोंगराळ भागात हल्ला केला, याच भागात इराणींनी युरेनियम आणि इतर अणु-संबंधित पायाभूत सुविधा साठवल्या होत्या.”

शनिवारी रात्री नेतन्याहू यांनी मंत्र्यांसोबत सुरक्षा बैठक घेतली आणि त्यांना सांगितले की, अमेरिकेचे अध्यक्ष इराणच्या अणुस्थळांवर हल्ला करण्याची शक्यता आहे. ही बैठक अनेक तास चालली. या काळात इस्रायलचे प्रशासन आणि गुप्तचर लष्करी संस्था अमेरिकेच्या संपर्कात होत्या. दुसऱ्या एका इस्रायली सूत्राने पोस्टला सांगितले की, अमेरिकन बी-2 बॉम्बरने इराणी अणुऊर्जा केंद्रावर हल्ला करायला सुरुवात केली तेव्हा ही बैठक संपली.

13 जून नंतर या युद्धात अमेरिकेच्या सहभागाबद्दल अनिश्चितता असल्याचे सतत वृत्त येत होते. ट्रम्प वारंवार इराणला शरण जाण्यास सांगत होते. परंतु अमेरिका वारंवार युद्धात सामील होण्याबाबत कोणतीही स्पष्टता देत नव्हती. एका इस्रायली सूत्राने सांगितले की “इराणींना हल्ला होणार आहे हे माहित असले तरी ते ते थांबवण्यासाठी काहीही करू शकले नसते.” इस्रायली अधिकाऱ्यांच्या मते, इराणचा बहुतेक अणुऊर्जा कार्यक्रम एकतर नष्ट झाला आहे किंवा त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;