बर्मिंगहॅम-दिल्ली विमान सौदीत उतरवले, एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बची धमकी

बर्मिंगहॅम-दिल्ली विमान सौदीत उतरवले, एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बची धमकी

एअर इंडियाच्या मागे असलेले शुक्लकाष्ठ हटण्याचे नाव घेत नाही. बर्मिंगहॅम येथून दिल्लीकडे येणाऱया एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक ए 1114 ला शनिवारी मध्यरात्री बॉम्बची धमकी मिळाली. त्यानंतर विमान सौदी अरेबियातील रियाध विमानतळावर उतरवण्यात आले. सर्व प्रवाशांना सुरक्षित उतरवण्यात आले.

सौदी अरेबियातील स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी धमकीनंतर विमानाची पूर्ण तपासणी केली. परंतु, या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. सर्व प्रवाशांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच त्यांच्या पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिली. या घटनेमुळे प्रवाशांना सहन करावा लागलेल्या मनःस्तापाबद्दल एअर इंडियाने दिलगिरी व्यक्त केली. दरम्यान, रियाध विमानतळावर विमानाची तपासणी पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना लवकरात लवकर दिल्लीला रवाना करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;