शेअर बाजारात धडाका… 12 कंपन्यांचे आयपीओ येणार

शेअर बाजारात धडाका… 12 कंपन्यांचे आयपीओ येणार

या आठवड्यात म्हणजे 23 जूनपासून शेअर बाजारात आयपीओचा धमाका होणार आहे. एकाच आठवड्यात तब्बल 12 कंपन्यांचे आयपीओ बाजारात येणार असून, त्यातून एकूण 15,800 कोटी रुपये उभारण्याचे कंपन्यांचे लक्ष्य आहे. पुढील आठवड्यात मेनबोर्ड सेगमेंटमध्ये पाच कंपन्यांचे आयपीओ येत आहेत. 24 जून रोजी तीन आयपीओ एकाच दिवशी उघडणार आहेत. कल्पतरू, एलेनबेरी, ग्लोब सिव्हिल प्रोजेक्ट्स अशा या कंपन्या आहेत. त्यांचे आयपीए 26 जून रोजी बंद होतील.

आठ कंपन्या शेअर बाजारात पदार्पण करणार!

पुढील आठवड्यात एकूण आठ कंपन्यांचे शेअर्स बाजारात लिस्ट होणार आहेत. एरिसिन्फ्रा सोल्युशन्स, समय प्रोजेक्ट सर्व्हिसेस, पाटील ऑटोमेशन, अ‍ॅपलटन इंजिनीअर्स, इन्फ्लक्स हेल्थटेक, मायाशील व्हेंचर्स, सेफ एंटरप्रायझेस रिटेल फिक्स्चर आणि आकार मेडिकल टेक्नॉलॉजीज यांचा समावेश आहे.

वर्षातील सर्वात मोठा आयपीओ ः एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसचा आयपीओ हा सर्वात मोठा आयपीओ ठरेल. एचडीएफसी बँकेच्या या रिटेल-केंद्रित एनबीएफसी कंपनीचा आयपीओ हा 12 हजार 500 कोटींचा असेल. याची किंमत बँड प्रति शेअर 700-740 रुपये निश्चित करण्यात आला असून, हा आयपीओ 27 जून रोजी बंद होईल.

मेनबोर्ड कंपन्यांचे पाच मोठे आयपीओ ः याशिवाय मेनबोर्ड कंपन्यांचे आणखी पाच आयपीओ येणार आहेत. संभव स्टील ट्यूब्सचा आयपीओ 25 जून रोजी उघडणार असून, किंमत पट्टा प्रति शेअर 77-82 रुपये आहे. एसएमई विभागामध्येही मोठी हालचाल दिसून येत आहे. एकूण 7 आयपीओ लाँच केले जातील.

बाजार सकारात्मक ः सध्या बाजारात सकारात्मक वातावरण आहे. मध्य पूर्व आणि टॅरिफमुळे जागतिक बाजारात अस्थिरता असली तरी हिंदुस्थानच्या शेअर बाजारात सध्या सकारात्मकता दिसून येत आहे. गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग दिसून येत आहे. चालू आर्थिक वर्षात पहिल्या सहामाहीत प्राथमिक बाजार खूप चांगला प्रतिसाद देत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;