कटरा-श्रीनगर ‘वंदे भारत’चे बुकिंग फुल, विमानाचे प्रवासी रेल्वेकडे वळले, पर्यटक सुखावले

कटरा-श्रीनगर ‘वंदे भारत’चे बुकिंग फुल, विमानाचे प्रवासी रेल्वेकडे वळले, पर्यटक सुखावले

कटरा ते श्रीनगरदरम्यान वंदे भारत रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मार्गावर 7 जूनपासून सुरू झालेल्या दोन गाड्या 25 जुलैपर्यंत जवळपास फुल आहेत. या दोन रेल्वे गाड्यांनी कश्मीर खोऱ्यात प्रवासाला नवा पर्याय दिला आहे. त्यामुळे पर्यटकांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. स्वस्त तिकिटामुळे विमान प्रवासीही रेल्वेकडे वळत आहेत.

रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्यिक प्रबंधक उचित सिंघल यांनी सांगितले की, कटरा-श्रीनगर लोकांना रेल्वे मार्ग खूप आवडत आहे. रोज किमान एक हजार प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. सोपोरचे व्यापारी फारूक अहमद म्हणाले की, आम्ही माल वेळेवर जम्मू आणि इतर बाजारात पाठवू शकत आहोत. कश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीने म्हटले की, रेल्वेने ने-आण खर्च घटला. शोएब हुसेन यांनी म्हटले की, वेळेवर पुरवठा करता येत आहे. विमानाचे प्रवासी रेल्वेकडे वळल्याने रेल्वेची प्रवासी संख्या घटली आहे.

  • कटराहून पहिली रेल्वे सकाळी 8.10 वाजता निघते ती 11.08 वाजता श्रीनगरला पोहोचते. दुसरी दुपारी 2.55 वाजता निघून सायंकाळी 5.53 वाजता पोहोचते. श्रीनगरहून सकाळी 8 आणि दुपारी 2 वाजता रेल्वे आहे. इकॉनॉमी क्लासचे भाडे 700-800 रुपये तर एक्झिक्युटिव्हचे भाडे 1,300-1,400 रुपये इतके आहे.
  • आधी दिल्ली-श्रीनगर विमान भाडे 12 ते 15 हजार रुपये होते, मात्र वंदे भारत सुरू झाल्यानंतर ते 6 ते 8 हजार रुपये झाले आहे. रेल्वेला पर्यटकांची पसंती मिळत आहे. वंदे भारतमुळे प्रवास स्वस्त झाला.
  • लोक रेल्वेने येण्यास प्राधान्य देत आहेत. तसेच हॉटेलचे बुकिंगही वाढत आहे. विमानांमध्ये 15 टक्के आसने रिकामी राहत आहेत. एका विमान कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, रेल्वेमुळे उड्डाणे आणि प्रवासी कमी झाले.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;