आता मतदार ओळखपत्राची होणार Home Delivery, ते ही फक्त 15 दिवसांत

आता मतदार ओळखपत्राची होणार Home Delivery, ते ही फक्त 15 दिवसांत

नव्याने नावनोंदणी केलेल्या मतदारांना त्यांच्या नावांची मतदार यादीत नोंद झाल्यानंतर अवघ्या 15 दिवसांच्या आत मतदार ओळखपत्र (EPIC) मिळणार आहे. 18 जून पासून निवडणूक आयोगाने ही सेवा सुरू केली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. निवडणूक आयोगाची ही सेवा फक्त नव्या मतदारांसाठीच नव्हे, तर पत्ता बदलेल्या, माहिती दुरुस्ती केलेल्या अर्जदारांनाही मिळणार आहे.

या नव्या सेवेत ECINet या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आयटी मॉड्यूल तयार करण्यात आले आहे, जे इंडिया पोस्टच्या API (Application Programming Interface) सोबत जोडलेले आहे. यामुळे पूर्वी 30 ते 45 दिवस लागायचे त्याऐवजी फक्त 15 दिवसांत ही सेवा मिळणार आहे.

राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या नव्या पद्धतीमुळे मतदार ओळखपत्र तयार होण्यापासून ते घरी पोहोचण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर SMS अलर्ट आणि रिअल-टाइम ट्रॅकिंगची सुविधा मिळणार आहे, ही प्रक्रिया सुरक्षित, पारदर्शक आणि वेगवान असून सुरक्षित असणार आहे. मतदार यादीत नवीन नाव नोंदवलेल्या मतदारांनी सांगितले की, ही व्यवस्थेमुळे कार्ड हरवण्याची शक्यता कमी असणार आहे. या व्यवस्थेमुळे तुमचे मतदार कार्ड कुठे असणार आहे याची माहिती मतदारांना मिळणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;