ऐन पावसाळ्यात सूर्य कोपला, उष्णतेच्या लाटेचा इशारा

ऐन पावसाळ्यात सूर्य कोपला, उष्णतेच्या लाटेचा इशारा

दक्षिण आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये मान्सून थांबल्याने पुढील दोन दिवस उत्तर हिंदुस्थानात तीव्र उष्णता जाणवू शकते, असे हवामान खात्याने सांगितले. मध्य प्रदेशसह 7 उत्तरेकडील राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे, तर राजस्थानमध्ये पारा पुन्हा एकदा 46 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज आहे.

अरबी समुद्रातून वेगाने पुढे जाणारा मान्सून 29 मेपर्यंत मुंबई, पुरी, बांगलादेशमार्गे सिक्कीममध्ये पोहोचला होता, परंतु तेव्हापासून तो 10 दिवस तिथेच अडकला आहे. हवामानशास्त्रज्ञांचा अंदाज आहे की, 12 जूनपासून मध्य हिंदुस्थानात हंगामी हालचाली वाढू शकतात. यामुळे मध्य प्रदेश, छत्तीसगडसह अनेक राज्यांमध्ये चांगला मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे.

  • 9 आणि 10 जून रोजी राजस्थान, दिल्ली, हरयाणा, पंजाब, चंदिगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  • छत्तीसगडमध्ये मान्सूनचा वेग मंदावला आहे. त्यामुळे गेल्या 6 दिवसांपासून अनेक जिह्यांमध्ये पाऊस किंवा ढग नाहीत. उष्णता आणि आर्द्रतेमुळे लोक त्रस्त आहेत.
  • हरयाणामध्ये पुन्हा एकदा अचानक उष्णता वाढत आहे. उष्णतेच्या प्रभावामुळे आर्द्रता वाढली आहे. शनिवारी हरयाणातील 9 शहरांचे तापमान 40 अंशांच्या पुढे गेले. सिरसा सर्वात उष्ण होते. येथील तापमान 44 अंशांवर पोहोचले आहे.
  • पुढील 4 दिवस हिमाचल प्रदेशात हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. मैदानी भागात उष्णता वाढेल.
  • गंगटोकमधील पाकयोंग येथे एमआय-17 हेलिकॉप्टरसह लष्कराच्या जवानांनी चाटेन भूस्खलनात अडकलेल्या सर्व लोकांचे बचावकार्य पूर्ण केले. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात भूस्खलन, पूर आणि दरडी कोसळल्या.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;