पाण्यापासून ग्रीन हायड्रोजनची निर्मिती, हिंदुस्थानी शास्त्रज्ञांनी विकसित केले उपकरण

पाण्यापासून ग्रीन हायड्रोजनची निर्मिती, हिंदुस्थानी शास्त्रज्ञांनी विकसित केले उपकरण

हिंदुस्थानी शास्त्रज्ञांनी सौर ऊर्जेचा वापर करून पाण्यापासून ग्रीन-हायड्रोजन तयार करणारे अभिनव उपकरण विकसित केले आहे. सेंटर फॉर नॅनो अ‍ॅड सॉफ्ट मॅटर सायन्सेस, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या स्वायत्त संस्थेतील शास्त्रज्ञांच्या पथकाने हे यशस्वी उपकरण तयार केले. या उपकरणाद्वारे केवळ सौर ऊर्जा आणि पृथ्वीवर सहज उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर करून पाण्याच्या रेणूंपासून ग्रीन-हायड्रोजन तयार करणे शक्य झाले आहे.

हिंदुस्थानने 2070 पर्यंत ‘नेट-झिरो’ कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्याचाच भाग म्हणून ग्रीन-हायड्रोजन हे सर्वात स्वच्छ आणि भविष्यातील इंधन म्हणून ओळखते जाते. याचा उपयोग वाहतूक, उद्योग आणि ऊर्जा साठवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. मात्र, आतापर्यंत ही प्रक्रिया महागडी आणि तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीची होती. मात्र या उपकरणाद्वारे ही प्रक्रिया सहजसोपी होईल.

संशोधनाचे नेतृत्व करणारे डॉ. आशुतोष सिंह यांच्या नेतृत्वाखालील टीमने स्मार्ट मटेरियल्सची निवड करून हेटरोजंक्शन डिझाईन तयार केले. त्याद्वारे मोठ्या प्रमाणात ग्रीन हायड्रोजन निर्माण केले. हेटरोजंक्शन डिझाईन वापरून सिलिकॉन आधारित फोटोएनोड तयार केला. या उपकरणाने 600 एमव्ही फोटोव्होल्टेज प्राप्त केले असून जे सौरउर्जेच्या सहाय्याने उच्च कार्यक्षमतेने हायड्रोजन निर्मितीस सक्षम करते, असे डॉ. आशुतोष सिंह यांनी सांगितले. जर्नल्स ऑफ मटेरियल केमिस्ट्रीमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;