अहमदाबाद विमान अपघात; 251 मृतांचे डीएनए जुळले

अहमदाबाद विमान अपघात; 251 मृतांचे डीएनए जुळले

अहमदाबाद विमान अपघातातील एकूण 251 मृतदेहांचे डीएनए नमुने जुळवण्यात यश आले आहे. त्यापैकी 245 मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आल्याची माहिती आज अधिकाऱ्यांनी दिली.

भीषण विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटत नव्हती. मृतदेह अत्यंत विदारक अवस्थेत होते. त्यामुळे मृतदेहांचे डीएनए जुळवण्याचा निर्णय घेण्यात आला. विमान अपघातात एकूण 270 जणांचा मृत्यू झाला. यात 241 प्रवाशांचा समावेश होता. तर एकमेव प्रवासी बचावला होता. एकूण 251 मृतदेहांचे डीएनए जुळवण्यात आले. त्यापैकी नातेवाईकांकडे सोपवण्यात आलेल्या 245 मृतदेहांमध्ये 176 हिंदुस्थानी, 49 ब्रिटीश, सात पोर्तुगीज आणि एका पॅनेडियन नागरिकाचा समावेश आहे.

खराब हवामानासाठी गाईडलाईन्स

खराब हवामानामुळे कुठलीही विमान दुर्घटना घडू नये यासाठी डीजीसीएने विमान पंपन्यांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. रात्रीच्या वेळी मुसळधार पावसात तसेच ओल्या धावपट्टीवर विमानांचे उड्डाण किंवा लँडिंग करता येईल की नाही याची खात्री किंवा शहानिशा वैमानिकांनी करून घ्यावी. त्यानुसारच विमान उड्डाणांचा निर्णय पंपन्यांनी घ्यावा  असे डीजीसीएने म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;