मध्यपूर्वेतील तणावाचा हिंदुस्थानातील इंधनपुरवठ्यावर परिणाम नाही, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांचा दावा

मध्यपूर्वेतील तणावाचा हिंदुस्थानातील इंधनपुरवठ्यावर परिणाम नाही, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांचा दावा

मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाचा हिंदुस्थानातील इंधन पुरवठ्यावर कुठल्याही प्रकारचा विपरित परिणाम होणार नाही, असा दावा पेंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केला आहे. हिंदुस्थानी नागरिकांना चिंता करण्याचे अजिबात कारण नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

पुरी यांनी एक्सवरून देशातील इंधन पुरवठा आणि उपलब्धता याबद्दल स्पष्ट केले आहे. मध्य पूर्वेतील बदलत्या भूराजकीय स्थितीवर हिंदुस्थान सरकार अतिशय बारकाईने नजर ठेवून आहे. गेल्या काही वर्षात इंधन पुरवठ्याच्या अनुषंगाने अनेक नवनवीन स्रोत हिंदुस्थानने शोधून काढले आहे. हिंदुस्थानात मोठ्या प्रमाणावर येणारे इंधन होर्मुज सामुद्र धुनीच्या माध्यमातून होत नाही. त्यामुळे हिंदुस्थानातील नागरिकांनी इंधन पुरवठ्याबद्दल चिंता व्यक्त करू नये. हिंदुस्थानातील इंधनसाठा कमी होणार नाही किंवा त्यावर कुठल्याही प्रकारचा विपरीत परिणाम होणार नाही, असा दावा पुरी यांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;