कोट्यवधी युजर्सचा पासवर्ड चोरीला; अकाऊंट हॅक होण्याचा धोका

कोट्यवधी युजर्सचा पासवर्ड चोरीला; अकाऊंट हॅक होण्याचा धोका

जगातील 30 डेटाबेसमधून सुमारे 16 अब्ज लॉगइन क्रेडेन्शिअल्सची चोरी झाली आहे. यात फेसबुक, इन्स्टाग्राम, जीमेल, अ‍ॅपल आणि असंख्य अन्य सेवांचा समावेश आहे. सर्वात मोठी पासवर्डस् चोरी असण्याची शक्यता आहे. यामुळे कोट्यवधी युजर्सचा डेटा लीक होण्याची भीती आहे. यामुळे डेटा चोरी, फिशिंग स्पॅम व खाते हॅक अशा संकटांचा सामना करावा लागू शकतो.

‘सायबर न्यूज’चे संशोधक गेली काही महिने डेटा चोरीचा अभ्यास करत आहेत. चोरलेला डेटा अतिशय नवीन असून, तो इन्फोस्टिलर्स मालवेअरच्या माध्यमातून गोळा करण्यात आला आहे. चोरीच्या या डेटामध्ये युजरनेम आणि पासवर्ड आहेत. मालवेअर युजर्सच्या फोनमधून हे डेटा चोरत आहेत. हॅकर्स याचा वापर थेट करतात किंवा डार्क वेबवर विकून टाकतात. 55 अब्ज लोकांकडे इंटरनेट उपलब्धता आहे. याचाच अर्थ एकाच व्यक्तीच्या अनेक खात्यांचा ओळख डेटा चोरला गेलेला आहे. त्यामुळे पासवर्ड बदलणे गरजेचे आहे.

कोणते पासवर्ड चोरले?

डेटाबेसकडे इंटरनेट सेवांच्या खात्यांचे लॉगइन नावे व पासवर्ड्स असतात. यात फेसबुक व इन्स्टाग्राम अशी समाजमाध्यमे, जी-मेलसारखी ई-मेल सेवादाते, गिटहबसारखे विकासक मंच, टेलिग्राम, व्हीपीएसारखे संदेश अ‍ॅप आणि सरकारी पोर्टल्स यांचा समावेश आहे. यातील यूआरएल, युजर नेम आणि पासवर्ड यांची चोरी हॅकर्सनी केली आहे.

काय कराल

  • तुमचा पासवर्ड तत्काळ बदला.
  • तुमच्या खात्यांसाठी टू फॅक्टर ऑथिंटिकेशन चालू करा
  • सोपे पासवर्ड बदला.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;