टेंभुर्णी- अकलूज मार्गावर दोन दुचाकींची धडक; तिघांचा मृत्यू, दोनजण जखमी

टेंभुर्णी- अकलूज मार्गावर दोन दुचाकींची धडक; तिघांचा मृत्यू, दोनजण जखमी

माढा तालुक्यातील टेंभुर्णीजवळ टेंभुर्णी अकलुज रोडवर मस्के वस्तीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला असून दोनजण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात ओंकार बाबासाहेब शिंदे (वय 18 वर्ष, रा. करकंब ता. पंढरपूर), प्रशांत कुंडलिक खडतरे (वय 22 वर्ष, रा. अकलूज ता.माळशिरस), निखिल अनिल वंजारे (वय 20 वर्ष, रा. करकंब ता. पंढरपूर) या तिघांचा मृत्यू झाला आहे.

सुरज अरुण लोखंडे (वय 18 वर्ष, रा.उपरी), दयावंत बंटी जाधव (वय 22 वर्षे, रा. अकलूज ता.माळशिरस), प्रशांत कुंडलिक खडतरे (वय 22 वर्ष रा. अकलूज ता.माळशिरस) हे तिघे मोटारसायकलने अकलूजच्या दिशेने जात होते. ते मस्के वस्तीजवळ आले असता अकलूजकडून ओंकार बाबासाहेब शिंदे व निखिल अनिल वजारे येत होते. त्यावेळी या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात प्रशांत कुंडलिक खडतरे या युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर ओंकार बाबासाहेब शिंदे यांचा टेंभुर्णीत उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तसेच निखिल अनिल वंजारी डोक्याला मार लागला असून त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्याला सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. या अपघातात सुरज अरूण लोखंडे आणि दयानंद बंडू जाधव हे किरकोळ जखमी झाले आहेत. सुरज लोखंडे यांनी टेंभुर्णी ठाण्यात रात्री उशीरा प्रशांत खडतरे व ओंकार शिंदे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. अधीक तपास पी.एस.आय मोरे तपास करीत आहेत .

वाढदिवसालाच झाला मृत्यू
या अपघातात प्रशांत कुंडलिक खडतरे याचा वाढदिवस होता. भावाचे लग्न असल्याने पत्रिका वाटपाचे कामासाठी ते सोलापूरला गेले होते. काम संपवून घराकडे निघाले होते. त्यावेळी परतताना अपघात झाला आणि वाढदिवसालाच त्याला मृत्यूने गाठले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;