इराण बंद करणार तेल कॉरिडॉर? जग ‘गॅस’वर

इराण बंद करणार तेल कॉरिडॉर? जग ‘गॅस’वर

अमेरिकेने अणुऊर्जा प्रकल्पांवर केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने लष्करी आणि आर्थिक असे दोन्ही मार्ग अवलंबण्याची तयारी केली आहे. इराणच्या संसदेने होर्मुझ तेल कॉरिडॉर बंद करण्याचा ठराव मंजूर केला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय देशाची सर्वोच्च सुरक्षा संस्था घेणार आहे.

होर्मुझ सामुद्रधुनी जलमार्ग हा केवळ इराणसाठीच नव्हे, तर जागतिक व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. जगातील जवळजवळ 20 टक्के तेल आणि वायूची वाहतूक या जलमार्गाने होते. हा कॉरिडॉर बंद झाल्यास जगातील तेल आणि वायूच्या व्यापारावर मोठा परिणाम होणार असून तेल महागण्याची शक्यता आहे. अर्थात, इराणच्या संसदेने हा कॉरिडॉर बंद करण्यास मान्यता दिली असली तरी तो नेमका कधी बंद करायचा याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, असे इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डस्चे कमांडर इस्माइल कोसारी यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;