मुंबईत मोकळी जागाच राहणार नाही, अतिक्रमणांवरून हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले

मुंबईत मोकळी जागाच राहणार नाही, अतिक्रमणांवरून हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले

सार्वजनिक भूखंडावरील अतिक्रमणे, बेकायदा बांधकामे रोखण्यात राज्य शासन व सरकारी अधिकारी अपयशी ठरले तर भविष्यात मुंबई व आसपासच्या परिसरात मोकळी जागाच राहणार नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने खडसावले.

सार्वजनिक मोकळय़ा जागेचा वापर हा लोकांसाठीच झाला पाहिजे. नफेखोर किंवा अतिक्रमण करणाऱयांकडून मोकळय़ा भूखंडाचा गैरवापर होता कामा नये याची काळजी राज्य शासन व सरकारी अधिकाऱ्यांनी घ्यायला हवी, असेही न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. अद्वेत सेठना यांच्या खंडपीठाने बजावले.

काय आहे प्रकरण…

चारकोप येथील लक्षण भंडारी चाळीतील काही रहिवाशांनी त्यांच्या घरांवरील कारवाईविरोधात याचिका केली होती. आमच्या झोपड्या 2000 सालच्या आधीपासून आहेत. आमचे पुनर्वसन करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यात केली होती. मात्र हे सरकारी जागेवर अतिक्रमण आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा लाभ देता येणार नाही, असे नमूद करत न्यायालयाने ही याचिका फेटाळली.

पुनर्वसनाच्या लोभाने अतिक्रमण करू नका

भविष्यात पुनर्वसन होईल या लोभाने लोकांनी मोकळय़ा भूखंडांवर अतिक्रमण, बेकायदा बांधकामे करू नयेत. अनधिकृत बांधकामे न करणे ही नागरिकांचीदेखील नैतिक जबाबदारी आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

वेळीच कारवाई होत नाही

अनधिकृत बांधकामांवर राज्य शासन व महापालिका वेळेवर कारवाई करत नाही. त्यामुळे तेथे राहणाऱ्यांचा समज होतो की, आपला त्या जागेवर हक्क निर्माण झाला आहे. याच गैरसजातून उच्च न्यायालय व अन्य न्यायालयात खटले दाखल होतात, असेदेखील खंडपीठाने नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;