जिंकू किंवा मरू….मात्र आता ध्येयपूर्ती झाल्याशिवाय थांबणार नाही; नेत्यानाहू यांची घोषणा

जिंकू किंवा मरू….मात्र आता ध्येयपूर्ती झाल्याशिवाय थांबणार नाही; नेत्यानाहू यांची घोषणा

इराण-इस्रायल युद्धाची तीव्रता वाढत असतानाच त्यात अमेरिकेनेही उडी घेतल्याने संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. या युद्धात इस्रायल किंवा इराण कोणीही माघार घ्यायला तयरा नसल्याने हे युद्ध लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही आमच्या अस्तित्वाची लढाई असून इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे आमच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आता जिंकू किंवा मरू…कितीही काळ युद्ध चालले तरी चालेल मात्र आता ध्येय साध्य झाल्याशिवाय युद्ध थांबवणार नाही, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिला आहे. त्यामुळे हे युद्ध लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आम्ही आमचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने टप्प्याटप्प्याने पुढे जात आहोत. इस्रायल इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि अणु कार्यक्रमाच्या दुहेरी धोक्यांना दूर करण्याचे आपले ध्येय पूर्ण करण्यावर ठाम आहे. त्यामुळे आता हे ध्येय पूर्ण झाल्याशिवाय हे युद्ध थांबणार नाही, असे त्यांनी संपष्ट केले. आम्ही विनाकारण युद्ध सुरू केलेले नाही. हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आता आम्ही थांबणार नाही, असे ते म्हणाले.

आमचे ध्येय साध्य झाल्यावर आम्ही युध्द वाढवणार नाही. आम्हाला विनाकारण युद्ध नको आहे. त्यामुळे आवश्यक असलेल्या गोष्टींपेक्षा आम्ही जास्त करणार नाही. मात्र, इराणच्या प्रतिहल्ल्याने हे युद्ध लांबण्याची शक्यता आहे. तसेच इराणचा इस्रायलसह जगाला धोका आहे. त्यामुळे उद्दिष्टे साध्य होतील, तेव्हा ऑपरेशन पूर्ण होईल आणि लढाई थांबेल, असे त्यांनी सांगितले.

इराणमधील ही राजवट आम्हाला नष्ट करू इच्छिते आणि म्हणूनच आम्ही आमच्या अस्तित्वाला असलेले धोके दूर करण्यासाठी ही कारवाई सुरू केली. त्यात अण्वस्त्र आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मोठा धोका आहे.. आम्ही ही उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने टप्प्याटप्प्याने पुढे जात आहोत. आम्ही ते पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आहोत,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून हे युद्ध तीव्र होण्याची आणि लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;