Mumbai News – महिला वैमानिकासोबत धावत्या टॅक्सीत छेडछाड, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Mumbai News – महिला वैमानिकासोबत धावत्या टॅक्सीत छेडछाड, तिघांविरोधात गुन्हा दाखल

महिला वैमानिकासोबत धावत्या टॅक्सीत छेडछाड केल्याची घटना मुंबईत उघडकीस आली आहे. महिलेच्या फिर्यादीवरून घाटकोपर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय महिला वैमानिक गुरुवारी रात्री तिच्या पतीला भेटायला कुलाबा येथे गेली होती. तिचा पती नेव्ही अधिकारी आहे. महिला घाटकोपर येथे एकटीच राहते. महिलेने पतीसोबत डिनर केले. यानंतर रात्री 10 वाजता ती टॅक्सीने घाटकोपर येथे घरी जाण्यासाठी निघाली.

यादरम्यान टॅक्सी चालकाने अचानक एका ठिकाणी टॅक्सी थांबवली. यानंतर दोन व्यक्ती टॅक्सीत बसल्या. त्यापैकी एक जण मागे महिलेशेजारी बसला होता. धावत्या टॅक्सीतच दोघांनी महिलेला चुकीचा स्पर्श करत तिचा विनयभंग केला. काही अंतरावर येताच समोर पोलिसांना पाहून दोन्ही आरोपी तात्काळ टॅक्सीतून उतरून पळून गेले. यानंतर टॅक्सी चालकाने महिलेला घाटकोपर येथे तिच्या निवासस्थानाजवळ सोडले आणि तो ही पळून गेला.

महिलेने घडला प्रकार आपल्या पतीला सांगितला. यानंतर दोघेही पती-पत्नी घाटकोपर पोलीस ठाण्यात गेले आणि अज्ञात आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;