प्रियकराच्या साथीने पतीची हत्या; दोन दिवस मृतदेह गाडीतून फिरवला; उत्तरप्रदेशमध्ये धक्कादायक घटना

प्रियकराच्या साथीने पतीची हत्या; दोन दिवस मृतदेह गाडीतून फिरवला; उत्तरप्रदेशमध्ये धक्कादायक घटना

उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मालमत्तेच्या हव्यासातून महिलेने प्रियकराच्या साथीने पतीची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर पतीचा मृतदेह गाडीत टाकला आणि त्या गाडीतून दोन दिवस प्रियकरासोबत फिरत राहिली. अखेर दोन दिवसांनी कोटद्वारच्या जंगलात मृतदेह फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली असून दोघांची तुरुंगात रवानगी झाली आहे.

मुरादाबाद शहरातील नगीना येथे घटना घडली. सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेला रवींद्र कुमार पत्नी रीनासोबत रामगंगा विहार कॉलनीत राहत होता. रीना फिजिओथेरपिस्ट असून तिचे बिजनोर नगीना येथील परितोष नावाच्या तरुणावर प्रेम होते. रविंद्र कुमारला रामगंगा विहार येथील घर विकायचे होते. हा आपल्या प्रेमात दुरावा करण्याचा प्रयत्न असल्याच्या संशयातून रीनाने प्रियकराच्या साथीने रविंद्र कुमारच्या हत्येचा प्लान आखला होता. रीना व तिच्या प्रियकराने कट रचून 31 मे रोजी रविंद्र कुमारची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

पोलिसांनी सांगितले की, रीना व तिच्या प्रियकराने 31 मे रोजी नगीना येथील परितोषच्या घरी रविंद्र कुमारची हत्या केली. रीनाने सुरुवातीला पतीला दारू पाजली. मग तिने त्याच्या मानेवर आणि छातीवर फावड्याने हल्ला केला. त्यात रविंद्र कुमारचा मृत्यू झाला. नंतर रीना व तिचा प्रियकर परितोष दोघांनी मिळून गाडीत मृतदेह टाकला आणि उत्तराखंडमधील रामनगरच्या जंगलात मृतदेह फेकण्याचा प्लान रचला. पण रामनगरच्या जंगलात संधी न मिळाल्याने ते कोटद्वारला आले आणि तेथील जंगलात मृतदेह फेकला. तो मृतदेह 5 जून रोजी आढळून आला. त्याचा अधिक तपास केल्यानंतर पोलिसांनी रवींद्र कुमारची ओळख पटवली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;