IND Vs ENG 1st Test – गिल-पंत-जैसवाल आणि 22 वर्षांपूर्वी तेंडुलकर-द्रविड-गांगुली; काय आहे या मैदानाचा इतिहास?

IND Vs ENG 1st Test – गिल-पंत-जैसवाल आणि 22 वर्षांपूर्वी तेंडुलकर-द्रविड-गांगुली; काय आहे या मैदानाचा इतिहास?

इंग्लंडच्या लीड्स येथे सुरू असलेल्या टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सर्वबाद 472 धावा केल्या आहेत. या सामन्यात कर्णधार शुभमन गिल, यशस्वी जैसवाल आणि ऋषभ पंत या तिघांनी शतकीय खेळी करत संघाला 400 पार नेलं. 22 वर्षांपूर्वी 2002 साली याच मैदानावर राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांनी पहिल्या डावात शतक ठोकलं होतं.

पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा पहिला डाव 472 धावांवर आटोपला. पहिल्या डावात यशस्वी जैसवाल (101), शुभमन गिल (147) आणि ऋषभ पंत (134) यांनी शतकीय खेळी केली. 22 वर्षांपूर्वी याच मैदानावर झालेल्या खेळाची पुनरावृत्ती चाहत्यांना पाहायला मिळाली. 2002 साली याच मैदानावर टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात सामना खेळला गेला होता. या सामन्यात राहुल द्रविड (148), सौरव गांगुली (128) आणि सचिन तेंडुलकर (193) यांनी पहिल्या डावात शतके ठोकली होती. त्यामुळे टीम इंडियाने आपला पहिला डाव 8 गड्यांच्या मोबदल्यात 628 धावांवर घोषित केला होता. हा सामना इंडियाने एक डाव आणि 46 धावांनी आपल्या खिशात घातला होता.

पहिल्या दिवसाचा डाव संपल्यानंतर सचिन तेंडुलकरने सुद्धा ट्वीटवर पोस्ट करत 2002 सालच्या आठवणींना उजाळा दिला होता. तो म्हणाला की,”केएल राहुल आणि यशस्वी जैसवाल यांनी रचलेल्या मजबुत पायामुळे हिंदुस्थानचा पहिला दिवस चांगला गेला. यशस्वी आणि शुभमन यांच्या शतक ठोकल्याबद्दल अभिनंदन. ऋषभ पंतचे योगदान सुद्धा तितकेच महत्त्वाचे होते. आजची टीम इंडियाची फलंदाजी पाहून मला 2002 मधील हेडिंग्ले कसोटीची आठवण झाली. तेव्हा राहुल, गांगुली आणि मी पहिल्या डावात शतके झळकावली होती. आणि आम्ही सामना जिंकला होता. पहिल्या डावात शुभमन आणि यशस्वीने त्यांची कामगिरी पार पाडली आहे. आता तिसरा शतकवीर कोण?” अस तो म्हणाला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;