ब्राझीलमध्ये हॉट एअर बलूनला भीषण आग, दुर्घटनेत 8 पर्यटकांचा मृत्यू

ब्राझीलमध्ये हॉट एअर बलूनला भीषण आग, दुर्घटनेत 8 पर्यटकांचा मृत्यू

हॉट एअर बलूनला भीषण आग लागल्याने दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला. यात अनेक जण जखमी झाले आहेत. ब्राझीलच्या दक्षिणेकडील सांता कॅटरीना राज्यात शनिवारी सकाळी ही घटना घडली. सांता कॅटरिनाचे गव्हर्नर जॉर्जिनो मेलो यांनी एक्स वर पोस्ट करत घटनेची पुष्टी केली. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

जॉर्जिनो मेलो यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉट बलूनमध्ये 22 पर्यटक होते. सकाळच्या सुमारास उड्डाणादरम्यान पर्यटकांच्या हॉट फुग्याला आग लागली आणि नंतर प्रेया ग्रांडे शहरात तो कोसळला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. तर 13 जणांना वाचवण्यात यश आले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्य लोकांचा शोध सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;