Photo – वेध लागले पांडुरंगाच्या दर्शनाचे; मुंबई ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा प्रस्थान

Photo – वेध लागले पांडुरंगाच्या दर्शनाचे; मुंबई ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा प्रस्थान

वारकरी परंपरेचा जागर करणाऱ्या श्री संत रोहिदास पायी दिंडी क्रमांक 24 चा भव्य प्रस्थान सोहळा मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे भक्तिभावात पार पडला. श्री पांडुरंग प्रतिष्ठान आणि श्री संत रोहिदास सेवा मंडळ, काळा किल्ला, धारावी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दिंडी पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवासासाठी मार्गस्थ झाली.

(सर्व फोटो – रुपेश जाधव)

या दिंडीची सुरुवात 1978 साली संस्थापक ह.भ.प. पांडुरंग कारंडे महाराज (कराडकर) यांनी केली होती. यंदा या दिंडीचे 48 वे वर्ष साजरे करण्यात येत आहे. या परंपरेचा आजही तेवढ्याच श्रद्धा, निष्ठा आणि भक्तिभावाने वारसा उचलत नित्यनेमाने आयोजन होत आहे.

प्रस्थानप्रसंगी दिंडीप्रमुख ह.भ.प. चंद्रकांत कारंडे, पांडुरंग प्रतिष्ठानचे डॉ. शांताराम कारंडे, तसेच दिंडी अध्यक्ष ह.भ.प. नारायण पाटील महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी मुंबईतील विविध भागांतून आलेल्या शेकडो वारकरी भक्तांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात, “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात, विठूनामाच्या अभंगात सामील होत पायी वारीस प्रारंभ केला.

दिंडीचा पहिला मुक्काम श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, वडाळा येथे झाला. त्यानंतर धारावी काळा किल्ला, मानखूर्द, आणि वाशी येथील जागृत शिवमंदिर येथे अनुक्रमे सकाळ, दुपार आणि संध्याकाळचे मुक्काम होतील. एक महिन्याचा हा प्रवास करत ही दिंडी आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी वाखरी येथे पोहोचणार आहे.

या काळात वारकरी ऊन, वारा, पावसाचे आव्हान स्वीकारत, प्रेम, निष्ठा आणि भक्तिभावाने मार्गक्रमण करतात. ही दिंडी केवळ प्रवास नसून, ती एक आध्यात्मिक चैतन्ययात्रा आहे. या यात्रेदरम्यान “पाऊले चालती पंढरीची वाट…” असा गजर आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या जयघोषात भाविक भक्त हरवून जातात.

आजच्या प्रस्थान सोहळ्यात शेकडो वारकरी भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुंबईतील सर्व भाविक भक्तांना या दिंडीत सहभागी होण्याचे आणि अध्यात्मिक लाभ घेण्याचे आवाहन श्री पांडुरंग प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;