जनतेच्या पैशाने उभारलेल्या समृद्धीवर लालपरीला मात्र बंदी

जनतेच्या पैशाने उभारलेल्या समृद्धीवर लालपरीला मात्र बंदी

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग पूर्णपणे सुरू झाला आहे. महायुती सरकारने त्याचा मोठा गाजावाजा केला. पण जनतेच्या पैशाने उभारल्या गेलेल्या या महामार्गावर सर्वसामान्यांच्या लालपरीला मात्र मनाई करण्यात आली आहे. एसटी बसेसना समृद्धीवर प्रवेश नसल्याने सामान्य जनतेला या महामार्गाचा काहीच फायदा होणार नाही.

‘मुंबई ते नागपूर’ समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा आहे. त्यावरून आठ तासांत मुंबई-नागपूर प्रवास केला जाऊ शकतो. परंतु त्या प्रवासाचा लाभ फक्त महागडय़ा गाडय़ांमधून फिरणाऱया श्रीमंतांनाच होणार आहे. कारण या महामार्गावर एसटीसारख्या सार्वजनिक वाहनांना प्रवेश नाही. मुंबईतील ‘अटल सेतू’ आणि ‘किनारा रस्ता’ यावरसुद्धा सार्वजनिक वाहनांना प्रवेश दिला गेलेला नाही.

एसटी बसेसना समृद्धीवर परवानगी द्या

समृद्धी महामार्गावर एसटी बसेसना परवानगी द्यावी अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. ‘समृद्धी’ महामार्ग सार्वजनिक निधीतून बनलेला आहे त्यामुळे तो सामान्य नागरिकांना वापरता आला पाहिजे. एसटी बसेसना समृद्धीवर प्रवेश देण्यात यावा आणि त्यांना टोलमाफीही दिली जावी, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;