दहा लाखांसाठी सात महिन्यांच्या गर्भवती विवाहितेस बेदम मारहाण, पतीवर गुन्हा दाखल

दहा लाखांसाठी सात महिन्यांच्या गर्भवती विवाहितेस बेदम मारहाण, पतीवर गुन्हा दाखल

तुझ्या आई वडीलांनी लग्नात मला काहीच दिले नाही,तुला नांदायचे असेल तर मला 10 लाख रुपये दे’ अशी सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीकडे मागणी करून शारिरीक व मानसिक छळ करून बेदम मारहाण केली.या प्रकरणी सिध्दी रोहीत दुधाणे (26) यांनी करवीर पोलीस ठाण्यात पती रोहित अर्जुन दूधाने याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादी सिध्दी दुधाणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे, ऑक्टोंबर 2024 ते 2 जून 2025 या कालावधीत वरणगे पाडळी गावात पती रोहित दूधाणे याने ‘तुझ्या आई वडीलांनी मला लग्नात काहीच दिलेले नाही म्हणून छळ सुरु केला होता.माहेरुन 10 लाख रुपये आणण्यासाठी तगदा लावला होता.पैसे आणले नाहीस तर ठार मारण्याची धमकी दिली होती.

संसार टिकवण्यासाठी सिध्दी या पतीकडून होणारा शारिरीक व मानसिक छळ सहन करीत होत्या.पतीकडून जास्तच त्रास होऊ लागल्याने,त्यांनी करवीर पोलीस ठाण्यात पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली.पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार पाटील तपास करीत आहेत.

नातेवाईकांना मारहाण

पंधरा दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळीचे प्रकरण ताजे असतानाच,आता कोल्हापूर जिल्ह्यातही असाच प्रकार समोर आला आहे.रोहितचे कारनामे समजल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी त्याच्यावर नजर ठेवली होती.अनैतिक संबंध असलेल्या महिलेसोबत तो एका लाॅजवर दोन दिवसांपूर्वी सापडल्या -नंतर चिडलेल्या रोहितने पीडितेच्या नातेवाईकांना मारहाण केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.त्यामुळे रोहितच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी पोलीसांकडून सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;