मारुती चितमपल्ली अनंतात विलीन

मारुती चितमपल्ली अनंतात विलीन

‘अरण्यऋषी’, ‘पद्मश्री’ मारुती भुजंगराव चितमपल्ली (वय 94) यांचे गुरुवारी (दि. 18) सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. आज अक्कलकोट रोडवरील सूत मिलहेरिटेज मणिधारी एम्पायर सोसायटीमधील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघाली. त्यांच्यावर रूपाभवानी मंदिराजवळील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मारुती चितमपल्ली यांना मानवंदना दिली.

वन्यजीवांबद्दल अपार प्रेम असणारे आणि पक्ष्यांसाठी जीवन वाहिलेले ‘अरण्यऋषी’ मारुती चितमपल्ली यांना अखेरची आदरांजली वाहण्यासाठी वैकुंठभूमीत मानवाच्या रूपात विविध ‘पक्षी’ अवतरल्याचा हृदयद्रावक प्रसंग पाहायला मिळाला. चितमपल्ली यांना मुखाग्नी देण्यापूर्वी अंबादास या निसर्ग कलाकाराने मोर, पोपट, चिमणी, कावळा यांच्यासह विविध पक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढून ‘अरण्यऋषी’ला शेवटचा निरोप दिला. पक्ष्यांच्या या विविध आवाजांमुळे वातावरणात गंभीरतेबरोबरच ‘अरण्यऋषी’ आपल्या अखेरच्या प्रवासाला निघाल्याचा भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता.

पोलीस बंदोबस्त

‘अरण्यऋषी’ मारुती चितमपल्ली यांची अंत्ययात्रा त्यांच्या ‘हेरिटेज मणिधारी एम्पायर’ या निवासस्थानापासून निघाल्यानंतर अंत्ययात्रेस वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने ठिकठिकाणी, चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता. त्याचप्रमाणे रूपाभवानी मंदिराजवळील स्मशानभूमीत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आज शोकसभेचे आयोजन

‘अरण्यऋषी’ मारुती चितमपल्ली यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या (दि. 20) सायंकाळी सहा वाजता श्री. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे, असे वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;