क्रिकेट खेळल्यानंतर समुद्रात अंघोळीचा मोह जीवावर बेतला, पालघरमध्ये अल्पवयीन मुलगा बुडाला

क्रिकेट खेळल्यानंतर समुद्रात अंघोळीचा मोह जीवावर बेतला, पालघरमध्ये अल्पवयीन मुलगा बुडाला

बीचवर क्रिकेट खेळल्यानंतर मित्रांसोबत समुद्रात अंघोळीसाठी गेलेला 17 वर्षीय मुलगा बुडाला. पालघरमधील सातपाटी येथील समुद्रकिनारी ही घटना घडली. उमेद इमरान शेख असे मयत मुलाचे नाव आहे. उमेदचे अन्य पाच मित्र समुद्रातून बाहेर पडल्याने बचावले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक मच्छिमार घटनास्थळी दाखल झाले. मच्छिमारांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

सातपाटी येथे मुस्लिम मोहल्ला परिसरात राहणारे सहा मित्र समुद्रकिनारी क्रिकेट खेळायला गेले होते. क्रिकेट खेळून झाल्यानंतर सहाही मित्र समुद्रात पोहायला उतरले. यावेळी उमेद समुद्राच्या लाटांच्या विळख्यात आला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला आणि उमेदचा समुद्रात बुडाला. उमेदचे मित्र वेळीच समुद्रातून बाहेर आल्याने वाचले.

पावसामुळे समुद्राला उधाण आले आहे. समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळल्याने उमेदचा शोध घेण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे शोध मोहिम थांबवण्यात आली. त्यानंतर ओहोटी आल्यानंतर पुन्हा शोध सुरू करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;