मुंबई लुटण्याचा डाव उधळून लावण्यासाठी आदित्य ठाकरे यांचा एल्गार, 9 जून रोजी करणार मार्गदर्शन

मुंबई लुटण्याचा डाव उधळून लावण्यासाठी आदित्य ठाकरे यांचा एल्गार, 9 जून रोजी करणार मार्गदर्शन

कुर्ला येथील मदर डेअरीची जागा उद्योगपती गौतम अदानी यांना देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. त्याविरोधात धारावीकरांमध्ये नाराजी आणि संतापाबरोबरच अस्वस्थताही आहे. तसेच धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली अदानीला तब्बल 540 एकर जमीन फुकटात देण्यात आली. शिवाय धारावीबाहेरील 600 एकर जमीन फुकटात देण्यात येत आहे. महायुती सरकारच्या या मनमानी कारभाराविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी कायम आवाज उठवला आहे.

धारावीच्या नावाखाली महायुती सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव उधळून लावण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे 9 जून 2025 रोजी मुलुंडच्या कालिदास सभागृहात ‘लढा आपल्या मुंबईचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आदित्य ठाकरे हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे. सोमवार 9 जून रोजी सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;