तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान, इंद्रायणी काठी वैष्णवांची मांदियाळी

तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान, इंद्रायणी काठी वैष्णवांची मांदियाळी

विठ्ठल जीवाचा जिव्हाळा ।
विठ्ठल कृपेचा कोवळा ।।
विठ्ठल प्रेमाचा पुतळा ।
लावियेला चाळा विश्व विठ्ठले ।।

तुकोबांच्या या अभंगवाणीप्रमाणे पंढरीच्या सावळ्या विठूरायाच्या भेटीची आस लागलेल्या लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने बुधवारी (दि.18) देहूतून दुपारी तीन वाजून 58 मिनिटांनी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. पालखी सभामंडपातून बाहेर पडताच वरूणराजाने पालखीवर जलाभिषेक केला अन् लाखो भाविक भक्तीरसात न्हाऊन गेले.

पालखीचा पहिला मुक्काम आज देहुतच, इनामदारवाडयात असणार आहे. यंदा पालखी सोहळ्याचे 340 वे वर्ष आहे. राज्याच्या कानाकोपर्यातून 500 दिंडया सहभागी झाल्या आहेत.

सोहळ्याच्या कार्यक्रमांना चौघडयाच्या निनादात पहाटेपासूनच सुरुवात झाली. पहाटे साडेचार वाजता काकड आरती झाली. पहाटे पाच वाजता श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे, विश्वस्त विक्रमसिंह महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे यांच्या हस्ते हस्ते महापूजा करण्यात आली. संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे आदींच्या हस्ते महाअभिषेक झाला. विठ्ठल-रूक्मिणी मातेची महापूजा करण्यात आली. पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्त उमेश महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे आदींच्या हस्ते महापूजा करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांमुळे वारकरी वेठीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालखी सोहळा प्रस्थानासाठी येणार असल्यामुळे पोलिसांनी दरवर्षीपेक्षा यंदा जास्त बंदोबस्त ठेवला होता. मुख्यमंत्री पावणेतीनच्या सुमारास मंदिरात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह आदींच्या हस्ते पादुका पुजन करण्यात आले. यावेळी मानाच्या दिडय़ांचा प्रवेश रोखला. त्यामुळे वारकरी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. तसेच धक्काबुक्की झाली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;