जेजुरीजवळ भीषण अपघात, कारची टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक; 8 ठार, 5 गंभीर

जेजुरीजवळ भीषण अपघात, कारची टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक; 8 ठार, 5 गंभीर

जेजुरी-मोरगाव रस्त्यावर असलेल्या किर्लोस्कर कंपनी जवळील ‘श्रीराम ढाब्या’ समोर स्वीफ्ट कारने पिकअप टेम्पोला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात आठजणांचा जागीच मृत्यू झाला असून, पाचजण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये सात पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

सोमनाथ रामचंद्र वायसे, रामू संजीवन यादव (रा. नाझरे कप, ता. पुरंदर), अजित अशोक जाधव (रा. कांजळे, ता. भोर), अक्षय शंकर राऊत (रा. झारगडवाडी, ता. इंदापूर), अजय कुमार चव्हाण (रा. उत्तर प्रदेश), किरण भारत राऊत (रा. पवारवाडी, ता. इंदापूर), सार्थक किरण राऊत, (पवारवाडी, ता. इंदापूर), अश्विनी शंकर ऐसार (रा. नागणसूर हेद्रे, सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत.

पुण्याहून मोरगावकडे जाणारी स्वीफ्ट डिझायर कार किर्लोस्कर कंपनी जवळून जात असताना, श्रीराम ढाब्यासमोर पिकअप टेम्पोला जोरदार धडक झाली. पिकअप टेम्पो येथील एका हॉटेलमध्ये नवीन फ्रीज घेऊन आला होता. या टेम्पोतील फ्रीज खाली उतरवत असताना, अचानक कारची टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक बसली. धडक एवढी भीषण होती की, शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या एका कारला स्वीफ्ट कार जाऊन धडकली.

या भीषण अपघातात टेम्पोमधील वस्तू खाली करणारे दोघेजण, श्रीराम ढाब्यासमोर उभे असणारे तिघे, तर स्वीफ्ट डिझायर कारमधील तिघेजण जागेवरच ठार झाले आहेत. तर दोन मुले, एक महिला, दोन पुरुष, असे पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुलीने ऐकावं यासाठी राणी मुखर्जी वापरते रिव्हर्स सायकॉलॉजीची ट्रीक; तज्ज्ञांच्या मते ही पद्धत किती सुरक्षित? मुलीने ऐकावं यासाठी राणी मुखर्जी वापरते रिव्हर्स सायकॉलॉजीची ट्रीक; तज्ज्ञांच्या मते ही पद्धत किती सुरक्षित?
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी केवळ तिच्या दमदार अभिनयासाठीच ओळखली जात नाही तर ती एक समजूतदार आई देखील आहे. ती तिच्या...
बघणारे बघून गेले, मंत्री म्हणून आम्हीच निस्तरणार! कुंडमळा दुर्घटनेनंतर गायब झाल्याने होत असलेल्या टीकेवर अजितदादांची भडास
पाणीपुरवठा विभागाचा खर्च मोठा, उत्पन्न कमी!
झेडपीची जालिंदरनगरची शाळा जगातील सर्वोत्तम 10 शाळांमध्ये; ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल’ यादीत समावेश
हातात हात, चेहऱ्यावर ग्लो; लंडनच्या रस्त्यांवर बॉयफ्रेंडसोबत गुटरगू करताना दिसली जान्हवी कपूर, चाहत्यानं गुपचूप काढला व्हिडीओ
आळंदीतून आज माउलींचे प्रस्थान!
इराणचा इस्रायलमधील रुग्णालयावर हल्ला, 47 जण जखमी; नेतन्याहू म्हणाले मोठी किंमत चुकवावी लागेल