मणिपुरात माणुसकीचं दर्शन; एअर इंडिया विमान अपघातात मृत्यू पावलेल्या दोन लेकींसाठी संघर्ष ठेवला बाजूला
एअर इंडियाच्या विमान अपघातात मणिपूरमधील दोन तरुणींचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून मणिपूरमध्ये जो संघर्ष सुरू आहे तो या मुलींच्या मृत्युमुळे कमी होणार आहे. कारण मरण पावलेली एक तरुणी कुकी आणि दुसरी मैतई समाजाची आहे. या दोघींच्या अंत्यसंस्कारानिमित्त दोन्ही समाज एकत्र येणार आहेत.
एनगंथोई शर्मा ही मैतेई समाजाची होती तर लामनुथिएम सिंगसोन ही कुकी समाजाची होती. दोघीही एअर इंडियामध्ये क्रु मेंबर म्हणून काम करत होत्या. अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातात दोघींचाही मृत्यू झाला. त्यामुळे दोन्ही समाजात शोकाकूल वातावरण होते. यांच्या मृत्यूमुळे दोन्ही समाजांत संवाद सुरू झाला आहे. या दोन्ही मुली मणिपूरच्या लेकी होत्या, त्यांचे एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय दोन्ही समुदायाने घेतला आहे.
मैतेई समाजाची प्रभावशाली संघटना कोकोमीने दोन्ही समाजांना शांतेतेचे अवाहन केले आहे. ही वेळ संघर्षाची नसून एकत्र येण्याची आहे. दोन्ही मुली आमच्याच होत्या. दोन्ही मुलींवर शांततेत अंत्यसंस्कार पार पडण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू असा शब्द या संघटनेने दिला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List