संगमेश्वरामध्ये घरात घुसला 8 फुटांचा अजगर, सर्पमित्रांकडून जीवदान

संगमेश्वरामध्ये घरात घुसला 8 फुटांचा अजगर, सर्पमित्रांकडून जीवदान

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की कोकणातल्या घरात साप घुसतात. असाच एका घरात साप नव्हे तर चक्क अजगर घुसला होता, तोही आठ फुटांचा. सर्पमित्रांनी वेळीच या घरात धाव घेतली आणि या अजगाराला जीवदान दिले.

रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्याती चिखली बौद्धवाडीत विकास मोहिते यांच्या घरात आठ फुटांचा महाकाय अजगर घुसला होता. या अजगराने सर्वप्रथम एका कोंबडीचा फडशा पाडला. दुसऱ्या कोंबडीकडे त्याचा मोर्चा वळलेला असताना विकास मोहिते यांच्या लक्षात आले आणि त्यांनी तातडीने अक्षय मोहिते यांना संपर्क साधला. अक्षय मोहिते व त्यांचे सहकारी सम्यक पवार यांनी अजगराला पकडण्याचे धाडस केले. हा अजगर त्यांनी जंगलात सोडून दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;