मोदींशी चर्चेनंतर ट्रम्प पुन्हा बोलले, मीच युद्ध थांबवलं!

मोदींशी चर्चेनंतर ट्रम्प पुन्हा बोलले, मीच युद्ध थांबवलं!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केल्यानंतर अवघ्या 12 तासांतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध मीच थांबवल्याचा दावा केला. युद्ध थांबवण्यासाठी मोदी सकारात्मक होते. त्यामुळे गोष्टी सोप्या झाल्या, असे नमूद करताना दोन्ही देशांमध्ये व्यापार करार घडवून आणणार, असे ट्रम्प म्हणाले.

मोदींशी काल रात्री माझं बोलणं झाले. आम्ही मोदींशी व्यापार करार करत आहोत, असे सांगतानाच मला पाकिस्तान हा देश आवडतो, असे ट्रम्प म्हणाले. त्यांनी पाकिस्तानचे सैन्यप्रमुख असीम मुनीर यांचे काैतुक केले. युद्ध थांबण्यासाठी हिंदुस्थानकडून मोदी व त्यांचे सहकारी तर पाकिस्तानकडून मुनीर यांचे मोठे सहकार्य मिळाले, असे ट्रम्प म्हणाले.

मोदींची ट्रम्प यांच्याशी 35 मिनिटे चर्चा

नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून 35 मिनिटे चर्चा झाली. यात मोदींनी ट्रम्प यांना ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली. पाकिस्तानच्या विनंतीवरूनच शस्त्रसंधी झाली. यात तिस्रया देशाची मध्यस्थी नव्हती आणि यापुढेही अशी मध्यस्थी आम्ही मान्य करणार नाही, असे या चर्चेत मोदींनी नमूद केल्याची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;