Air India चा खोळंबा! आज तीन उड्डाणे केले रद्द, कारण काय? वाचा

Air India चा खोळंबा! आज तीन उड्डाणे केले रद्द, कारण काय? वाचा

अहमदाबाद विमानाच्या दुर्घटनेनंतर एअर इंडियाचे दिवस फिरल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी एअर इंडियाने दिवसभरात बोईंग ड्रीमलायनरसह सात आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केले होते. आजही एअर इंडियाने तीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली. यामागे तांत्रिक बिघाड, देखभाल आणि इतर कारणांचा समावेश आहे. यापैकी दोन उड्डाणे प्रवासी विमानात बसल्यानंतर रद्द करण्यात आली. तर एक उड्डाण मध्येच परत बोलवण्यात आले. या सर्व उड्डाणांचा संबंध बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानांशी आहे, ज्यांची सध्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) आदेशानुसार तपासणी सुरू आहे.

रद्द झालेली उड्डाणे

टोरंटो-दिल्ली (AI188): या उड्डाणाला तांत्रिक कारणांमुळे रद्द करण्यात आले. प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले आणि त्यांना पर्यायी व्यवस्था किंवा पूर्ण परतावा देण्याची ऑफर देण्यात आली.

दुबई-दिल्ली (AI996): या उड्डाणाला देखील तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आले. प्रवाशांना विमानात बसल्यानंतर त्यांना पुन्हा उतरवण्यात आले.

दिल्ली-बाली (AI2145): हे विमान बालीजवळील ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या अहवालामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मध्येच दिल्लीला परत आणण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;