हिंदीसह तिसरी भाषा सक्तीला राज्यभरातून जोरदार विरोध, साहित्यिक-मराठीप्रेमींनी दिला आंदोलनाचा इशारा

हिंदीसह तिसरी भाषा सक्तीला राज्यभरातून जोरदार विरोध, साहित्यिक-मराठीप्रेमींनी दिला आंदोलनाचा इशारा

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी नवा जीआर काढून पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी तिसरी भाषा अनिवार्य करून त्यात हिंदीचा समावेश केला. शासनाच्या या निर्णयाचा राज्यभरातले साहित्यिक, प्रकाशक, शिक्षक, कलावंत, मराठीप्रेमी आणि मराठीसाठी काम करणाऱया संस्थांनी तीव्र निषेध केला. शासनाने त्वरित हा निर्णय रद्द करावा अन्यथा शांततापूर्ण आंदोलन करू, असा इशारा साहित्यिकांनी दिला.

पुणे येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेत बैठक आज मराठीप्रेमींची बैठक झाली. बैठकीला मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार, लेखक अच्युत गोडबोले, राजीव तांबे, तसेच अनेक साहित्यिक, प्रकाशक, शिक्षक, अनेक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. इतर कोणत्याही राज्यात तिसरी भाषा सक्तीची नाही, मग महाराष्ट्रात का, असा सवाल यावेळी उपस्थितांनी केला. हिंदीची सक्ती अमान्य असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

मराठी भाषा व संस्कृती संपवण्यासाठीच हिंदीची सक्ती

भाजपाला हिंदी भाषेची सक्ती करून मराठी भाषा व संस्कृती संपवायची आहे. भाजपा व रा. स्व. संघाचा हा डाव असून त्याची अंमलबजवाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. या हिंदी सक्तीला काँग्रेसचा विरोध असून कोणत्याही परिस्थितीत राज्यात हिंदीची सक्ती लादू देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती होऊ देणार नाही

केंद्रात मोदी आणि शहा बसलेले असताना गुजरातमध्ये हिंदीची सक्ती नाही. आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक अशा अनेक राज्यात हिंदीची सक्ती नाही. मग महाराष्ट्रातच असे धोरण का लादले जाते? आम्ही महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती होऊ देणार नाही, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. याबाबत सर्व मुख्याध्यापकांना पत्र देणार असल्याचे ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;