चार राज्यांत पोटनिवडणूक, एनडीए आणि इंडिया आघाडीचा लागणार कस

चार राज्यांत पोटनिवडणूक, एनडीए आणि इंडिया आघाडीचा लागणार कस

आज चार राज्यांतील सात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. पोटनिवडणुकांच्या जागा कमी आहेत. असे असले तरी या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए आणि काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीचा कस लागणार आहे. अनेक ठिकाणी प्रतिष्ठेच्या लढाया असून काही ठिकाणी या निवडणुकीमुळे स्थानिक राजकारणाला नवे वळण मिळणार आहे.

पंजाब – लुधियाना पश्चिम
लुधियाना पश्चिम भागात आमदार गुरप्रीत सिंग गोगी यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. आम आदमी पार्टीने आपल्या जागेवर पुन्हा विजय मिळवण्यासाठी राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांना तिकिट दिले आहे. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे भरत भूषण आशू, भाजपचे जीवन गुप्ता आणि शिरोमणी अकाली दलचे परूपकार सिंग घुम्मन रिंगणात आहेत.

पश्चिम बंगाल – कालिगंज
टीएमसीचे आमदार नासीरुद्दीन अहमद यांचे निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. टीएमसीने त्यांच्या मुलीला, अलिफा अहमद यांना उभे केले आहे. अल्पसंख्याक आणि महिला मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. भाजपने स्थानिक कार्यकर्ता आशिष घोष यांना उभे केले असून, काँग्रेस-डाव्या आघाडीने काबिल उद्दीन शेख यांना उमेदवारी दिली आहे.

गुजरात – कडी आणि विसावदर
गुजरातमधील कडी आणि विसावदर या दोन ठिकाणी पोटनिवडणुका होत आहेत. कडीमध्ये भाजपचे आमदार करसणभाई सोलंकी यांच्या निधनामुळे ही निवडणूक होत आहे. या ठिकाणी भाजपकडून राजेंद्र चावडा, काँग्रेसकडून रमेश चावडा आणि आम आदमी पार्टीकडून जगदीश चावडा हे तीन उमेदवार एकमेकांशी लढत आहेत.

केरळ – निलांबूर
निलांबूरमध्ये होणारी ही निवडणूक पुढील विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीची शेवटची मोठी चाचणी आहे. पी. व्ही. अन्वर यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. पी.व्ही अन्वर आधी डाव्यांच्या पाठिंब्यावर जिंकले होते, नंतर काँग्रेसमध्ये गेले आणि आता अपक्ष म्हणून उभे आहेत. काँग्रेसकडून माजी आमदाराचे पुत्र आर्यादन शौकत हे रिंगणात आहेत. डाव्या पक्षांनी एम. स्वराज यांना उमेदवारी दिली आहे. निलांबूर ही जागा वायनाड लोकसभा मतदारसंघात येते, जिथे प्रियांका गांधी सध्या खासदार आहेत. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही आघाड्यांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;