वाचाल तर वाचाल! 21 राज्यांमध्ये 10 लाख लोकांनी स्वीकारला राष्ट्रीय वाचन दिनाचा संकल्प

वाचाल तर वाचाल! 21 राज्यांमध्ये 10 लाख लोकांनी स्वीकारला राष्ट्रीय वाचन दिनाचा संकल्प

राष्ट्रीय वाचन दिनानिमित्त ‘पठतु भारतम्, वर्धताम् भारतम्।’ ही वाचन जागृती मोहीम देशभरात उघडण्यात आली आहे. या अभियानांतर्गत 21 राज्ये, अनेक शाळा, महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्था सज्ज झाल्या आहेत.

या वर्षी 19 जूनचा राष्ट्रीय वाचन दिन एक चळवळ आणि उत्सव दोन्ही असणार आहे. रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट, ग्रामीण रिलेशन्स चळवळीतील ‘ज्ञान की फिट की’, वाचन प्रशिक्षक रीता राममूर्ती गुप्ता आणि मीनाक्षी लेखी यांच्या पुढाकाराने ही मोहीम गुजरात, महाराष्ट्र, आसाम, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, पंजाब, ओडिशा, नागालँड, मध्य प्रदेश, कर्नाटक, बिहार, केरळ, झारखंड, हरियाणा, आंध्र प्रदेश, दिल्ली, जम्मू-कश्मीर, लडाख या राज्यांत व केंद्रशासित प्रदेशांत पोहोचवली जात आहे.

मुंबईत 19 जून रोजी दुपारी 1 ते 2 दरम्यान नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (NGMA) येथे विद्यार्थ्यांचा वाचन सत्र होईल. NGMA दिल्ली आणि बेंगळुरूही या उपक्रमात सहभागी होत आहेत. मुंबईतील बीटीटीसी, एसआयईएस कॉलेजेस, खासगी आणि महानगरपालिकेच्या शाळा, तसेच सामान्य नागरिकही इंस्टाग्रामवरून सहभागी होत आहेत.

NGMA च्या संचालक निधी चौधरी म्हणाल्या, ‘NGMA ‘पठतु भारतम्, वर्धताम् भारतम्’ चळवळीत सहभागी होऊन अभिमान वाटतो. 19 जून रोजी सायं. 4 ते 5 दरम्यान नागरिकांनी येथे येऊन कला आणि मानवजातीच्या सामायिक इतिहासाची ओळख वाचनातून घ्यावी’.

Over 1 Million Pledge to Read on National Reading Day Across 21 Indian States

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;