शिर्डीत पादचाऱ्याचे अपहरण करून खून; शिर्डीतील अल्पवयीन मुलांचे कृत्य

शिर्डीत पादचाऱ्याचे अपहरण करून खून; शिर्डीतील अल्पवयीन मुलांचे कृत्य

रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्याचे चोरीच्या उद्देशाने अपहरण करून त्याला मारहाण करून गळा आवळून पाठीत चाकू भोसकून खून करण्यात आला. खून झालेल्या इसमाच्या मोबाईलची विक्री करून त्या पैशांतून वाढदिवस साजरा करणाऱ्या सात अल्पवयीन मुलांना शिडीं पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खून झाल्यानंतर तब्बल आठ दिवसांनी गुन्ह्याची उकल झाली, अशी माहिती पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली.

गणेश सखाहरी चत्तर (वय 42, रा. हंडेवाडी रोड, चासनळी, कोपरगाव) असे खून झालेल्याचे नाव आहे. 8 जूनपासून गणेश चत्तर घरातून बेपत्ता होते. याबाबत पोलीस नाईक गजानन गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. नांदुर्खी बुद्रुक शिवारात शेतात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. शिर्डी पोलिसांनी ‘अकस्मात मृत्यू’चा गुन्हा दाखल केला होता.

कोपरगाव पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार पोलिसांनी मृताची ओळख पटविली. मृताच्या पाठीवर धारदार शस्त्राने भोकसल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिला. मृताचा मोबाईल अल्पवयीन मुलांनी साडेचार हजार रुपयांना विकला.

त्यातून मिळालेल्या पैशांतून आरोपींनी मित्राच्या वाढदिवसाची पार्टी केली. मोबाईल खारे दीदाराने तो सुरू केल्याने पोलिसांनी ज्याने मोबाईल विकत घेतला, त्याच्याकडे चौकशी केली.

आरोपींतील एकाने हा मोबाईल विकला असल्याचे समोर आले. त्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून घटनेची सर्व माहिती पुढे आली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. शिर्डी पोलिसांनी अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल केला आहे, असे माहिती पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;