विद्याधर चिंदरकर, निगवेकर, तुळशी यांची ‘निवासी संपादक’पदी नियुक्ती

विद्याधर चिंदरकर, निगवेकर, तुळशी यांची ‘निवासी संपादक’पदी नियुक्ती

दैनिक ‘सामना’च्या मुंबई आवृत्तीचे सहाय्यक संपादक विद्याधर चिंदरकर, पुणे आवृत्तीचे सहाय्यक संपादक अरुण निगवेकर आणि छत्रपती संभाजीनगर आवृत्तीचे सहाय्यक संपादक गणेश तुळशी यांची ‘निवासी संपादक’पदी नियुक्ती करण्यात आली आहे. दैनिक ‘सामना’चे मुख्य संपादक उद्धव ठाकरे यांच्या संमतीने कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मंगळवारी एका बैठकीत या तिघांनाही पदोन्नतीसह नियुक्ती पत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले.

विद्याधर चिंदरकर, अरूण निगवेकर व गणेश तुळशी हे तिघेही गेल्या 32 वर्षांहून अधिक काळापासून दै. ‘सामना’च्या सेवेत आहेत. उपसंपादक-वार्ताहरपदापासून निवासी संपादकपदापर्यंतच्या काळात या तिघांनीही विविध पदांबरोबरच वार्तांकन, लेखन, संपादकीय संस्कार आणि वृत्तपत्रीय पानांची सजावट इत्यादी जबाबदाऱया पार पाडल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;