धुळे विश्रामगृहात सापडलेल्या घबाडाचे प्रकरण दडपले का? संजय राऊत यांचा फडणवीसांना सवाल

धुळे विश्रामगृहात सापडलेल्या घबाडाचे प्रकरण दडपले का? संजय राऊत यांचा फडणवीसांना सवाल

धुळे येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या 1 कोटी 85 लाखांच्या घबाडाचे प्रकरण दडपले का, असा थेट सवाल शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. सखोल तपास झाला नाही तर नाइलाजाने या प्रकरणातील आणखी स्पह्ट करावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

महाराष्ट्राच्या प्रतिमेला डाग लावणारे हे प्रकरण माजी आमदार अनिल गोटे यांनी उघड केले होते. यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणातील अनेक गोष्टी निदर्शनास आणल्या आहेत. 21 मेच्या मध्यरात्री धुळे जिह्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहाच्या 102 नंबरच्या खोलीत 1 कोटी 85 लाखांचे घबाड सापडले. त्या खोलीतून तीन कोटी रुपये आधीच बाहेर नेले व 10 कोटी जालन्यात पोहोचवले होते. धुळे दौऱयावर आलेल्या अंदाज समितीच्या अध्यक्षांच्या ‘पीए’च्या खोलीत ही रक्कम होती व धुळ्यातील ठेकेदारांकडून अंदाज समितीच्या अध्यक्षांना ‘नजराणा’ देण्यासाठी खंडणीरूपाने 15 कोटी रुपये जमा करण्यात आले, असे संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.

एसआयटीची घोषणा ही निव्वळ धूळफेक

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ‘एसआयटी’ स्थापन करण्याची वरपांगी घोषणा आपण केली. त्या एसआयटीचे पुढे काय झाले? त्याचे प्रमुख कोण? हे समजले नाही. त्यामुळे एसआयटीची घोषणा ही निव्वळ धूळफेक आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी या पत्रात केला आहे.

फक्त एनसी नोंदवून प्रकरण दडपले

खंडणीरूपाने जमा केलेल्या या रकमेबाबत एक साधा ‘अदखलपात्र’ गुन्हा दाखल करण्यात आला व प्रकरण दडपण्यात आले असे आता समोर आले आहे. ही बाब लाजीरवाणी असून मुख्यमंत्री भ्रष्टाचाराच्या प्रकरणात किती गंभीर आहेत हे दर्शविणारे असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

रेशन दुकानदारांना धमकावून पैसे जमा

धुळे जिल्हा पुरवठा अधिकाऱयाने तोंडी आदेश देऊन रेशन दुकानदारांकडून प्रत्येकी 10000 प्रमाणे 1 कोटी 47 लाख रुपये गोळा केले. ही रक्कम फक्त तीन तासांत गोळा केली. पैसे जमा झाले नाहीत तर ‘समिती’चे सदस्य दुकानांवर रेड टाकतील, असे निरोप देण्यात आले व त्यानंतर पैसे जमा केले. याबाबतची अधिक माहिती आपण देऊ शकतो, असे संजय राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे.

अर्जुन खोतकर यांना ‘महाराष्ट्र भूषण’ आणि ‘पीए’ना पद्मश्री द्या

आपल्या राज्यात हे असेच चालणार असेल तर राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक खाते बरखास्त करून मोकळे व्हा व भ्रष्ट अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांना ‘महाराष्ट्र भूषण’ व त्यांचे ‘पीए’ किशोर पाटील यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करून राज्यातील भ्रष्टाचाऱयांचा बहुमान करा, असा टोलाही संजय राऊत यांनी या पत्रात लगावला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;