देवदर्शनावरून येताना सादळे-मादळे घाटामध्ये पत्नीचा खून, पळून गेलेला पती सोलापूर पोलिसांसमोर हजर; खुनाची दिली कबुली

देवदर्शनावरून येताना सादळे-मादळे घाटामध्ये पत्नीचा खून, पळून गेलेला पती सोलापूर पोलिसांसमोर हजर; खुनाची दिली कबुली

हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी सादळे-मादळे घाटामध्ये वन विभागाच्या हद्दीत पतीने पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. जोतिबाचे दर्शन करून परत येत असताना पतीने घाटामध्ये पत्नीवर वार करून खून केल्याचे उघडकीस आले आहे. खून करून पती सोलापूरकडे पळून गेला होता. मात्र, शनिवारी सकाळी सोलापूर येथे पोलिसांत हजर होत त्याने खुनाची कबुली दिली.

शुभांगी सचिन रजपूत (वय – 30) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सचिन चंद्रशेखर रजपूत (रा. कळबळगी, बागलकोट, कर्नाटक) असे आरोपी पतीचे नाव आहे.

सचिन व शुभांगी यांचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा आहे. सचिन सैन्यामध्ये नोकरीला होता. कुटुंबासह दिल्लीमध्ये राहत होता. सचिन आणि शुभांगीमध्ये नेहमी कौटुंबिक वाद होत असल्याने सततच्या त्रासाला कंटाळून शुभांगी वडिलांकडे (निलजी, ता. गडहिंग्लज) निघून आली होती. गेली काही वर्षे ती मुलासह आई-वडिलांसोबत राहत होती. सचिन चार वर्षे नोकरीवर नव्हता, तसेच तो गावातून गायब होता.

15 दिवसांपूर्वी सचिन हा शुभांगीच्या आई-वडिलांना भेटून ‘मी नोकरी करतो, व्यवस्थित राहतो,’ असे सांगून शुभांगीला घेऊन आला. नोकरीनिमित्त गेल्या 15 दिवसांपासून तो शिये (ता. करवीर) येथे राहू लागला. गुरुवारी सायंकाळी पती-पत्नी जोतिबाच्या दर्शनासाठी गेले. दर्शनानंतर घरी परत येत असताना कासारवाडी सादळे-मादळे घाटामध्ये वन विभागाच्या हद्दीमध्ये दोघे बोलत बसले होते. तेथे सचिन रजपूत याने शुभांगी रजपूत हिच्या गळा, चेहरा आणि पोटावर चाकूने वार केले. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह तेथेच टाकून सचिन सोलापूरकडे निघून गेला. शनिवारी सकाळी सोलापूर येथील पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून हजर होऊन त्याने खून केल्याची कबुली दिली.

शिरोली पोलीस स्टेशनला खुनाची माहिती प्राप्त झाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, सहायक फौजदार प्रमोद चव्हाण, अमित पांडे, नीलेश कांबळे, पोलीस पाटील महादेव सुतार, शोभा कांबळे यांच्यासह पोलीस पथक कासारवाडी घाटात दाखल झाले.

सचिनने दिलेल्या माहितीच्या आधारे संपूर्ण घाट पिंजून काढला असता, वन विभागाच्या हद्दीत रस्त्यापासून जवळच दगडामध्ये शुभांगीचा मृतदेह आढळला. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;