मुंबईकरांसाठी ‘थेंबे थेंबे तळे साचे’! तलाव क्षेत्रात धुवांधार, पवई ओव्हरफ्लो

मुंबईकरांसाठी ‘थेंबे थेंबे तळे साचे’! तलाव क्षेत्रात धुवांधार, पवई ओव्हरफ्लो

मुंबईकरांना पाणी पुरवठा होणाऱया सात तलावांमध्ये सध्या जोरदार पाऊस होत असल्यामुळे 8 टक्क्यांपर्यंत खाली आलेला जलसाठा आता 10.19 टक्क्यांवर पोहोचला आहे. यातच पुढील पाच दिवस राज्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे समाधानकारक स्थिती निर्माण झाली आहे. औद्योगिक वापरासाठी उपयुक्त ठरणारे पवई तलाव आज ओव्हरफ्लो झाले.

मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज 3 हजार 950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. त्यामुळे वर्षभराच्या पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्यासाठी सातही तलाव ओसंडून वाहणे गरजेचे आहे. हे तलाव ओव्हरफ्लो झाले नाहीत तर मुंबईवर पाणीकपातीचे संकट येऊ शकते. मात्र सद्यस्थितीत पडणारा पाऊस पाहता या वर्षीदेखील सातही तलाव वेळेत तुडुंब होतील अशी आशा आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;